महिलेने प्रियकराला लावला फोन, म्हणाली - प्रेग्नेंसी किट घेऊन ये आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:37 PM2022-09-30T12:37:06+5:302022-09-30T12:38:14+5:30
Crime News : दोन दिवसांआधी मंगळवारी दुपारी खुशबूने राहुलला फोन करून सांगितलं की, तिला वाटतं ती प्रेग्नेंट आहे. तिने राहुलला एक प्रेग्नेन्सी कीट घेऊन भेटायला बोलवलं.
Crime News : उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील मुगलसराय भागात रेल्वेत नोकरी करणाऱ्या महिलेच्या हत्येसंबंधी धक्कादायक खुलासा केलाय. पोलिसांनुसार, खुशबू नावाच्या महिलेची हत्या तिचा प्रियकर राहुल कुमार प्रजापति यानेच केली होती. राहुलच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यामुळे त्याच्यात आणि खुशबूमध्ये प्रेम झालं. खुशबू सुद्धा विधवा होती. ती रेल्वेत नोकरी करत होती. दोघांनी अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले होते. राहुल खुशबूवर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण ती त्यासाठी तयार नव्हती.
दोन दिवसांआधी मंगळवारी दुपारी खुशबूने राहुलला फोन करून सांगितलं की, तिला वाटतं ती प्रेग्नेंट आहे. तिने राहुलला एक प्रेग्नेन्सी कीट घेऊन भेटायला बोलवलं. जेव्हा राहुल तिच्या घरी गेला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी खुशबूने रागाच्या भरात राहुलच्या कानशीलात लगावली. त्यानंतर राहुल संतापला आणि त्याने गळा दाबून खुशबूची हत्या केली.
खुशबू रवी नगर भागात महिला सहकाऱ्यासोबत राहत होती. दोघीही विधवा होत्या. पतीच्या निधनानंतर दोघींनाही अनुकंप तत्वावर रेल्वेत नोकरी मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी साधारण सहा वाजता ड्यूटी संपल्यावर जेव्हा डॉलीने खुशबूला फोन केला तेव्हा तिने उचलला नाही. डॉली घरी पोहोचली तर तिला दरवाजा बाहेरून उघडा दिसला. डॉलीला आधी वाटलं की, खुशबू कदाचित झोपली असेल, त्यामुळे तिने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. ती उठली नाही तर डॉलीने शेजाऱ्यांना सांगितलं. डॉलीने नंतर खुशबूच्या बहिणीला फोन केला. ते लगेच तिथे आले आणि खुशबूला रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तिला तिथे मृत घोषित केलं.
राहुल कुमार प्रजापति उर्फ बिट्टू विधुर होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि त्याला एक मुलगी आहे. तेच मृत खुशबूला सुद्धा एक मुलगी आहे. खुशबूच्या पतीचं कोरोना काळात निधन झालं होतं. खुशबूचा पती रेल्वेत नोकरी करत होता. राहुल रेल्वेत ठेकेदाराकडे काम करत होता. ड्युटी दरम्यान राहुलची भेट खुशबूसोबत झाली. दोघांचं नातं जुळलं. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आले. दोघांनी अनेकदा संबंध ठेवले. इतकंच नाही तर गरज पडल्यास खुशबू राहुलला पैसेही देत होती.
ही ब्लाइंड केस सॉल्व करण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली. यादरम्यान रूममधील एका टेबलवर पोलिसांना एक प्रेग्नेंसी कीट मिळाली. खुशबू तर विधवा होती, यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी घराच्या आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले. मंगळवारी एक व्यक्ती खुशबूच्या घरात जाताना दिसून आला. पोलिसांनी तपास केल्यावर ते राहुलपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने सगळं खरं सांगितलं. आरोपीला अटक करून तुरूंगात पाठवण्यात आलं.