लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:41 AM2021-05-23T09:41:52+5:302021-05-23T09:42:23+5:30

प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे घडली.

Lovers commits suicide by opposing marriage | लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या   

लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या   

googlenewsNext

नांदेड : प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे घडली.
अविवाहित तरुण दत्ता भिंगोरे (२४) व विवाहित शारदा माने (२५) यांचे प्रेमसंबंध होते. विवाहिता ही पतीशी पटत नसल्यामुळे चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथे वास्तव्याला होती. याच ठिकाणी दोघांचे सूत जुळले होते. परंतु दोघांच्या संबंधांची कुणकुण नातेवाईकांना लागली होती. शारदा ही विवाहित असल्यामुळे भिंगोरे यांच्या कुटुंबीयांनी प्रेमसंबंधाला विराेध दर्शविला. तसेच दत्ताच्या घरच्या मंडळींनी त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. परंतु दत्ताने शारदासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. 
विरहाच्या विचाराने दोघेही निराश झाले होते. एकाच चितेवर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Lovers commits suicide by opposing marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.