प्रियकर की मुले, काय निवडावे? असे काही घडले की, पळून गेलेली महिला गेल्यापावली परत आली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:47 AM2022-10-14T11:47:55+5:302022-10-14T11:48:19+5:30

रामपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील महिला ४ दिवसांपूर्वी आपल्या तीन मुलांना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती.

Lovers or children, what to choose? married Women Ran with Lover but return after looking childrens Crying | प्रियकर की मुले, काय निवडावे? असे काही घडले की, पळून गेलेली महिला गेल्यापावली परत आली

प्रियकर की मुले, काय निवडावे? असे काही घडले की, पळून गेलेली महिला गेल्यापावली परत आली

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये अजब प्रेम की गजब कहानी घडली आहे. प्रियकराचे प्रेम आईच्या प्रेमापुढे फिके पडले आहे. एक महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. परंतू, काही दिवसांतच मुलांची केविलवाणी अवस्था ऐकून ही महिला गेल्या पावली परत आली. 

रामपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील महिला ४ दिवसांपूर्वी आपल्या तीन मुलांना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. आई कुठे गायब झाली, या विचाराने लहान असलेली मुले कावरीबावरी झाली. त्यांनी आपल्या वडिलांसोबत आईला शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाणे, आई कुठे कुठे जात होती, नातेवाईकांकडे ही मुले रडत रडत फिरू लागली. परंतू, कोणालाच काही सांगता येईना की त्यांची आई कुठे आहे. 

गावातील काही लोकांनी पोलीस ठाण्याच्या इन्स्पेक्टरला ही बाब सांगितली. राहुल कुमार गंगवार यांनी तिचा शोध घेतला. तिला शोधले आणि तिच्या मुलांना भेटविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती पती आणि मुलांच्या समोर आली तेव्हा देखील ती पुन्हा येण्यास तयार नव्हती. मग पोलिसांनी आणि तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला मुलांच्या कावरेबावरेपणाबाबत सांगितले, तेव्हा तिने लगेचच मुलांना जवळ घेतले. मुले तेव्हाही आईच्या नावे टाहो फोडत रडत होती. 

ते पाहून तिच्यातील आई जागी झाली. तिने लगेचच प्रियकराला तिथून जाण्यास सांगितले. प्रियकराचे प्रेम धुडकावले आणि पती आणि मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. याबरोबर पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीस आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. पोलिसांचेही या लोकांनी आभार मानले. 

Web Title: Lovers or children, what to choose? married Women Ran with Lover but return after looking childrens Crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.