प्रेमी युगुलाने घरातून पळून घेतला गळफास लावून, आत्महत्या करण्यापूर्वी WhatsAppवर पाठवले लोकेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:22 PM2022-01-09T18:22:35+5:302022-01-09T18:23:16+5:30
Suicide Case : फतेहपूर येथे मडेला सरदारपुरा रोडजवळ थांबून त्यांनी शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने WhatsAppवर घटनेचे लोकेशनही नातेवाईकांना पाठवले.
सीकर - घरातून पळून गेलेल्या जयपूरच्या प्रेमी युगुलाने सीकरमधील फतेहपूर येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. रामदेव मीना यांचा मृत मुलगा लोकेश मीना हा आमेर येथील खोरामिना गावातील रहिवासी होता असून सपना ही मदनलाल यांची मुलगी, खोरा लाडखनी येथील रहिवासी होती. जे जयपूरहून बाईकने सीकरला आले होते. फतेहपूर येथे मडेला सरदारपुरा रोडजवळ थांबून त्यांनी शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने WhatsAppवर घटनेचे लोकेशनही नातेवाईकांना पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही ७ जानेवारीच्या रात्री घरातून पळून गेले होते. तेव्हापासून दोघांचेही नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.
सायंकाळी सहा वाजता लोकेशन पाठवले, मध्यरात्री एक वाजता मिळालेली माहिती
फतेहपूर सदरठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी तरुणाने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घटनेचे लोकेशन आपल्या मावशीच्या मुलाला WhatsAppवरून पाठवले होते. त्या आधारे कुटुंबीय त्यांच्या शोधात फतेहपूरला पोहोचले. जेथे दोघेही शेतातील खेजरीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यावर त्यांनी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास फतेहपूर सदर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह झाडावरून काढले आणि शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले.
होते प्रेम संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लोकेश मीना आणि सपना यांच्या आत्महत्येमागे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमसंबंध नातेवाईकांनी मान्य न केल्याने दोघांनीही घरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी प्रथम दोरी खरेदी केली. यानंतर निर्जन ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.