१ हजारात मिळत होता कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट; डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे घोटाळा झाला उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 06:36 PM2020-08-08T18:36:14+5:302020-08-08T18:36:51+5:30
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीजीआयच्या समितीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लखनऊ – उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमध्ये कोरोना व्हायरसच्या रिपोर्टमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना रिपोर्टमध्ये काळाबाजारी करुन कोविड १९ चा निगेटिव्ह रिपोर्ट दिला जात होता. यासाठी फक्त ५०० ते १००० रुपये संबंधितांकडून घेतले जात असे. पीजीआयच्या सुरक्षा समितीने चौकशीनंतर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखनऊच्या पीजीआय रुग्णालयाचे प्रोफेसर एसपी अंबेश यांनी सांगितले की, रुग्णालयात उपचार घेण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाची कोरोना टेस्ट करण्यात येत होती. नमुने घेतल्यानंतर रुग्णांना सेवा संस्थांनाच्या इमारतीत थांबण्याची परवानगी होती. यादरम्यान काही लोकांनी सेवा संस्थानच्या इमारतीत राहिलेल्या लोकांकडून पीजीआयमध्ये कोविड १९ ची टेस्ट करण्यासाठी ५०० ते १ हजार रुपये घेतले आणि कोरोनाचा हुबेहुब निगेटिव्ह रिपोर्ट दिला जात होता, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीजीआयच्या समितीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात रुग्णांवर दुसऱ्या आजारासाठी उपचार होत असे. शुक्रवारी एक रुग्ण कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे पोहचला, हुबेहुब रिपोर्ट पाहून डॉक्टरांना शंका आली त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे याची तक्रार केली. त्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षा समितीने अज्ञात लोकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या संपूर्ण घोटाळ्यात मेडिकल व्यवसायाशी निगडीत काही लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास आतापर्यंत किती लोकांना फसवण्यात आलं आणि यामध्ये कोणाचा समावेश आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! सप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार? विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं बनवला प्लॅन
रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरुन हटवला; मणगुत्तीमध्ये शिवप्रेमी संतापले
वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं अमृता फडणवीस यांना खुलं पत्र
“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी