बापरे! प्रेयसीने मागितले १० लाख रुपये, न दिल्याने तरुणाचे अश्लील फोटो केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:13 PM2023-07-17T12:13:05+5:302023-07-17T12:13:41+5:30
एका तरुणीने तरुणाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण आतापर्यंत तरुणाने तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल केल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण, उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीने आपल्याच तरुण मित्राकडे १० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्यास तरुणाने नकार दिला तेव्हा रागाच्या भरात तरुणीने त्या तरुणाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे त्या तरुणाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी, तरुणीने अगोदर तरुणाकडे १० लाख रुपयांची मागणी केली. तरुणाने हे पैसे देण्यास नकार दिला. यानंतर तरुणीने तरुणाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
'लग्न हेच माझ्या तब्येतीचे रहस्य', पाचव्या लग्नानंतर ९० वर्षीय 'आजोबा' म्हणाले, आता आणखी लग्न करणार
प्रयागराज येथील रहिवासी असलेला युवक सरोजिनी नगर औद्योगिक परिसरात असलेल्या ऑटोफॉर्ममध्ये काम करायचा. यादरम्यान लखनऊच्या आझाद नगरमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. तिथे उन्नावमधील बिघापूर येथे राहणारी तरुणी आधीच राहत होती. एकाच घरात राहत असताना तरुण आणि तरुणीची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये फोनवर गप्पा सुरू झाल्या. यावेळी आरोपी हेमाने तरुणाचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केले. त्यानंतर ती ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. मात्र, यादरम्यान तरुणाने तरुणीला समजवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ती मान्य झाली नाही आणि १० लाख रुपयांची मागणी करू लागली. न दिल्याने आरोपी तरणीने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार करून तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप या तरुणाने केला असून त्यामुळे त्याची नोकरी गेली आहे. तर दुसरीकडे त्या तरुणाचे एका तरुणीसोबत लग्नही ठरले होते आता ते लग्नही मोडल्याचे त्याने सांगितले. तरुणाने आता सायबर सेलमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवली. पोलीस गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहेत.