"सासऱ्याची सुनेवर वाईट नजर"; आई, बहिणींचा जीव घेणाऱ्या अर्शदच्या सासूचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:25 IST2025-01-02T11:24:32+5:302025-01-02T11:25:14+5:30
आई आणि चार बहिणींची हत्या करणाऱ्या अर्शदच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

"सासऱ्याची सुनेवर वाईट नजर"; आई, बहिणींचा जीव घेणाऱ्या अर्शदच्या सासूचा धक्कादायक खुलासा
लखनऊच्या नाका पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये आई आणि चार बहिणींची हत्या करणाऱ्या अर्शदच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अर्शदची सासूने महत्त्वाची माहिती दिली आहे. अर्शदच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्याची पत्नी चांदनीने घर सोडलं होतं. आता दोघं वेगळे झाले आहेत. आई आणि बहिणींच्या हत्येनंतर आता चांदनीची आई पुढे आली असून अर्शदचं कुटुंब नेमकं कसं होतं ते सांगितलं आहे.
चांदनीच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने अर्शदच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे वडील सुनेकडे घाणेरड्या नजरेने पाहत असे. कोरोना लॉकडाऊन दरम्यान त्याचं मुलगी चांदनीशी लग्न झालं. मात्र त्याने मुलीला दोन महिन्यातच सासरचं घर सोडण्यास भाग पाडलं. महिलेने दावा केला आहे की, मुलीने तिला सांगितलं होतं की, सासऱ्यांची तिच्यावर वाईट नजर होती. अर्शदचे वडील आपल्या सुनेला जवळ बसायला सांगत. जेव्हा ती पतीसोबत असते तेव्हा सासरे तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत असत.
अर्शदच्या सासूने त्याच्या आईचे कौतुक केलं आहे. त्या म्हणाल्या की, अर्शदची आई खूप चांगली महिला होती. तिने स्वतःच चांदनीला माहेरी परत जा अन्यथा हे लोक तुझी हत्या करतील असं सांगितलं होतं. सासूचं म्हणणं ऐकूनच मुलगी आपल्या घरी परतली. यानंतर चांदनी अर्शदपासून वेगळी झाली
आग्रा येथे राहणारा अर्शद सध्या मीडियावर व्हि़डीओ अपलोड केल्यामुळे चर्चेत आहे. त्याच्यावर स्वतःची आई आणि चार बहिणींना लखनौला नेऊन हॉटेलमध्ये मारल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या बहिणींचा छळ करताना आणि त्यांच्या हाताची नस कापून त्यांना मारताना दिसत आहे. यानंतर त्याने हत्येचं कारणही सांगितलं.