लखनऊचे दहशतवादी कनेक्शन; २०१७ मध्येही दहशतवाद्याचा केला होता खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:02 PM2021-07-11T19:02:21+5:302021-07-11T19:07:42+5:30
Lucknow's terrorist connections : ओसामा बिन जावेद या आणखी एका दहशतवाद्याचे नाव दिले होते, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने ठार केले होते.
लखनऊ: घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच एटीएसने लखनऊचा काकोरी परिसराला सील ठोकले आहे. एटीएसला घराच्या आत लावलेल्या प्रेशर कुकर बॉम्बची माहिती मिळाली असल्याने बॉम्ब पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी एटीएसने हा परिसर सील केला असून कोणालाही निर्बंधित परिसरात जाऊ दिले जात नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
एटीएसने दहशतवाद्यांकडून काही प्रमाणात स्फोटकेही जप्त केली असून अटक केलेले दहशतवादी जम्मू स्फोटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. असे म्हटले जात आहे की, या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानातील आहेत. शाहिदचे घर सील करण्यात आले आहे. कमांडो घराच्या आत असून शाहिदच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.
मार्च २०१७ मध्ये सुरक्षा दलांनी लखनऊमध्ये लपून बसलेला दहशतवादी सैफुल्लाला ठार मारले, जो इसिसच्या खोरासन मॉड्यूलचा सदस्य होता. तो कानपूरचा रहिवासी होता. या घटनेनंतर कानपूर आणि उन्नाव येथेही अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होत. सप्टेंबर २०१८ मध्ये, हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमरुझमान उर्फ कमरुद्दीन उर्फ डॉ. हुरैरा याला शिवनगर कॉलनी, जाजमऊ अहिरवान, चकेरी येथे अटक केली गेली. एनआयए आणि एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान त्याने ओसामा बिन जावेद या आणखी एका दहशतवाद्याचे नाव दिले होते, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने ठार केले होते.
भाजपाचे बडे नेते दहशवाद्यांच्या निशाण्यावर; प्रेशर कुकर बॉम्बने साखळी स्फोट घडवण्याचा कट एटीएसने उधळलाhttps://t.co/JofqIYmwSE
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2021
एक दहशतवादी उन्नाव येथील आहे
पहिल्या दहशतवाद्याचे नाव शाहिद उर्फ गुड्डू असे सांगितले जात आहे, जो उन्नावचा रहिवासी आहे. आणखी एक दहशतवादीही त्याच्या घरात लपला होता. हे दोघेही प्रशिक्षित दहशतवादी आहेत. घरात स्फोटकं सापडली आहेत. एटीएसची टीमही उन्नावकडे रवाना झाली आहे.
BREAKING: लखनऊमध्ये एटीएसची मोठी कारवाई, 'प्रेशर कुकर' बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटकhttps://t.co/oJZL2KDMYm
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2021