रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:35 PM2021-04-27T19:35:53+5:302021-04-27T19:38:03+5:30

Redmesivir Injection : याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

The lure of giving remdesivir injections online; Filed a crime against an unknown person | रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देगांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर: आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने रेमडेसिविर इंजेक्शनची रुग्णांना दोन ते तीन तासात डिलिव्हरी मिळेल, असा मेसेज व्हायरल करणाऱ्या अज्ञात मोबाईलधारक व बँकखाते क्रमांक धारकाविरोधात सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे. सध्या कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढत असून रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे आमिष दाखविले जात आहे. पैसे भरण्यासाठी एक खाते क्रमांकही दिला जात आहे. अशाच स्वरूपाचा मेसेज सुवेंद्र गांधी यांच्या कार्यकर्त्यांना आला होता. अशा मेसेजच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी गांधी यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सांगितली. याबाबत अधीक्षक पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनबाबत अशा प्रकारचा मेसेज आला तर कुठल्याही खाते क्रमांकावर  पैसे टाकू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.

Web Title: The lure of giving remdesivir injections online; Filed a crime against an unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.