आलीशान घर, ४ दुकानं तरीही आरिफनं मागितला हुंडा, वडिलांनीही घरासाठी दिले होते पैसे
By पूनम अपराज | Published: March 4, 2021 06:41 PM2021-03-04T18:41:06+5:302021-03-04T18:41:46+5:30
Ayesha Suicide Case : गेल्या शनिवारी आयेशाने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवून आरिफला पाठवला.
अहमदाबादमधील आयेशा आत्महत्या प्रकरणात तिचा नवरा आरिफ खानला पोलिसांनीअटक केली असून त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरिफवर हुंडा मागण्याची मागणी केली आणि आयशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. असे म्हटले जाते की, आरिफच्या कुटुंबाची परिस्थिती खूप चांगली आहे. जालौर (राजस्थान) येथील उच्चभ्रू परिसरात आरिफचे एक आलिशान घर आहे. या कुटुंबाकडे भाड्याने दिलेली ४ दुकाने देखील आहेत. असे असूनही, आरिफ आणि त्याचे कुटुंबीय आयशावर हुंड्यासाठी दबाव आणत होते.
दुकानाच्या भांड्यातून ५० हजार रुपये महिन्याचे उत्पन्न
आरिफ आणि त्याचे वडील बाबू खान एका खाण कारखान्यात काम करतात. दोघांनाही चांगला पगार मिळतो. याशिवाय चार दुकानाच्या भाड्यातून दरमहा सुमारे ५० हजार रुपये भाडे मिळते. आयशाचे वडील लियाकत अली सांगतात की, आरिफ आपली मुलगी आयशाला मोहरी आणून सोडत असे. काही कामाचे कारण देऊन तो आयशाला वडिलांकडून पैसे मागायला सांगायचा.
लियाकत अली टेलरिंगचे काम करतात. त्याचे कुटुंब एका लहान भाड्याच्या घरात राहते. त्यांनी घर बांधण्यासाठी काही पैसे जमा केले होते, त्यांनी आरिफला दीड लाख रुपयेही दिले.
चौकशीत आरिफ सहकार्य करत नाही
बुधवारी दुपारी आरिफला अतिरिक्त मुख्य मेट्रो कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी कोर्टाकडे ५ दिवसांचा रिमांड मागितला होता, परंतु केवळ ३ दिवसाचा रिमांड मंजूर केला. याप्रकरणी आम्हाला अनेक तपास करावे लागतील, असे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी सांगतात. अशा परिस्थितीत आम्ही कोर्टाला ५ दिवसांच्या रिमांडची मागणी केली. आरिफ चौकशीत सहकार्य करीत नाही. बहुतेक प्रश्नांवर तो गप्प बसतो.
Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...
"चाहे आप कोई मजहब के हो..."; आयेशा आत्महत्येनंतर ओवैसी यांचं 'हे' विधान ठरलंय चर्चेचा विषय
गेल्या शनिवारी आयेशाने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवून आरिफला पाठवला. आयेशाच्या आत्महत्येनंतर व्हिडिओ व्हायरल होताच आरिफ घरातून पळाला. गुजरात पोलिस जलोरमध्ये त्याच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, तो लग्नाला गेला होत. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे सोमवारी रात्री आरिफला पाली येथून अटक करण्यात आली. जेव्हा पोलिसांनी आरिफला पकडले तेव्हा त्याने काही केले नसल्याचा आव आणून पोलिसांसोबत चालायला सुरवात केली. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नव्हता.
लग्नानंतर अफेअरचा आरिफवर आरोपआयशाचे वकील जफर पठाण यांनी दै. भास्करला सांगितले की, २३ वर्षीय आयेशाचे राजस्थानमधील जालौर येथे राहणाऱ्या आरिफशी लग्न झाले होते. राजस्थानातील एका मुलीशी आरिफचे प्रेमसंबंध होते. आरिफ आयेशासमोर व्हिडिओ कॉलवर गर्लफ्रेंडशी बोलत असे. प्रेयसीवर आरिफ खूप पैसा खर्च करायचा. म्हणूनच तो आयेशाच्या वडिलांकडून पैशाची मागणी करत असे. गर्भवती असताना आरिफच्या वागण्यामुळे आयेशा तणावात होती. ती नैराश्यात होती. त्यामुळे तिचे बाळ गर्भाशयातच मरण पावले.
आरिफला शिक्षा झाली पाहिजे - आयेशाचे वडील
आयेशाचे वडील लियाकत अली यांनी मंगळवारी सांगितले की, आरिफच्या वडिलांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी फोन करायचो, परंतु त्याने माझा फोन कधीच उचलला नाही. माझी आयेशा परत येणार नाही, परंतु तिच्या अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून दुसर्याच्या मुलीचे असे होणार नाही. माझी मुलगी आयेशा आनंदी होती, पण हुंडाबळीनंतर तिचे आयुष्य नरकमय झाले. एकदा सासरच्यांनी तिला 3 दिवस अन्न दिले नाही.