एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:18 AM2020-09-22T06:18:58+5:302020-09-22T06:19:11+5:30

दोन नातेवाईकांचे फोन टॅप; बंगळुरू एसआयटीने केला तपास

M. M. The riddle of Kalburgi's murder is solved | एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे

एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे

Next

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश, विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या चौकशीसाठी काही लोकांचे मोबाईल फोन बंगळुरू पोलिसांच्या एसआयटी पथकाने टॅप केले होते. त्यापैकी गौरी लंकेश यांच्या हत्याकटात सहभागी असलेल्यांपैकी एकाच्या नातेवाईकांनी मोबाईलवरून केलेल्या संभाषणातून कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणामागील सूत्रधारांचा पोलिसांना छडा लागला. विशेष म्हणजे टॅप केलेले हे संभाषण अवघे १९० सेकंदांचे (३ मिनिटे १० सेकंद) आहे.


एम. एम. कलबुर्गी यांची हत्या २०१५ मध्ये व गौरी लंकेश यांची २०१७ मध्ये झाली. गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत हल्लेखोर परशुराम वाघमारे याला मोटारसायकलवरून नेणाऱ्या गणेश मिस्किनला जुलै २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली. ही गोष्ट गणेश मिस्किनचे दोन नातेवाईक मोबाईलवरून एकमेकांना सांगत होते. आपले फोन टॅप होत आहेत


याची त्यांना कल्पना नव्हती. या संभाषणातून पोलिसांना नेमका हल्लेखोर कोण असावा, याचा छडा लागला.
गणेश मिस्किनचा एक नातेवाईक रवी मिस्किन आपल्या एका नातेवाईकाला (ज्याला तो अंकल असे म्हणतो) मोबाईल फोनवरून
सांगत होता की, माझा मोठा भाऊ गणेश हा दोन हत्या प्रकरणांमध्ये गुंतला आहे. त्यावर अंकलनी विचारलेल्या प्रश्नावर रवीने पुन्हा तेच सांगितले.

प्रयोगशाळेत तपासले आवाजाचे नमुने
गौरी लंकेश यांची हत्या केल्याच्या आरोपावरून गणेश मिस्किन व त्याचा मित्र अमित बड्डी याला हुबळी येथून पोलिसांनी अटक केली. नेमके त्याच दिवशी रवी मिस्किन हा त्याच्या अंकल या नावाने ओळखल्या जाणाºया नातेवाईकाशी मोबाईल फोनवर बोलला होता. त्यानंतर रवी व त्याच्या अंकलच्या आवाजाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यातून टॅप केलेल्या मोबाईलमधील संभाषण या दोघांचेच असल्याचा पुरावा बंगळुरू एसआयटी पथकाला मिळाला. त्यानंतर गणेश मिस्किनची कसून चौकशी केली असता कलबुर्गी यांच्या हत्याकटातही सहभागी होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.

Web Title: M. M. The riddle of Kalburgi's murder is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.