I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:42 IST2022-04-21T18:40:50+5:302022-04-21T18:42:16+5:30
Suicide Case : मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या
यमुनानगर - 'माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुमचा अपमान होताना दिसत नसल्याने मी आत्महत्या करणार आहे. हे शब्द व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर कारखान्याच्या मालकाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने विषारी द्रव्य पियून आत्महत्या केली. मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अमर विहार कॉलनी जगाधरी येथील दुर्गादास यांचा आरोप आहे की, ते आणि त्याचा मुलगा चेतन मेटल फॅक्टरीत काम करायचे. कारखान्याचे मालक मोहित, भानू यांनी मारहाण केली होती. यामुळे दुखावलेल्या मुलाने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला गाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आत्महत्येपूर्वी मृताने वडिलांच्या नावाने एक व्हिडिओ मेसेजही रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये तरुण म्हणतोय की, आय लव यू पप्पा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुमचा अपमान सहन करू शकत नसल्याने आत्महत्या करत आहे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. डीएसपी प्रमोद शर्मा यांनी घटनास्थळ गाठून संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस ठाण्याचे डीएसपी प्रमोद कुमार म्हणाले की, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. पोलिस आरोपींवर कारवाई करत असल्याची आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. याप्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत.
मृताचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी आठ महिन्यांची गरोदर आहे. वडिलांचे म्हणणे आणि मोबाईलमधून मिळालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कारखाना चालकाची दोन मुले मोहित आणि भानू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.