गावगुंडांचा हैदोस; व्यापाऱ्यांसह नोकराला मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:14 PM2021-08-08T18:14:43+5:302021-08-08T18:15:18+5:30
Crime News : पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतल्याचे समजते.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील राहुल शूज दुकानाच्या मालकासह नोकराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री झाला. याप्रकारने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतल्याचे समजते.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात राहुल शूज नावाचे प्रसिद्ध दुकान असून शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ५ ते ६ जणांच्या टोळक्याने, अचानक दुकानातील नोकर दीपक छाब्रिया याला बाहेर बोलावून लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सोडविण्यासाठी गेलेले दुकान मालक दीपक गोखलानी यानाहीं मारहाण केली. मारहाणीत नोकर दीपक छाब्रिया गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकारने व्यापाऱ्यांत खळबळ उडून भितीचे वातावरण निर्माण झाले. अशी प्रतिक्रिया युटीए व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी दिली. संतप्त झालेल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून गावगुंडावर कारवाई करण्याची मागणी केली.
गेल्या आठवड्यात फर्निचर मार्केट मध्ये माल घेऊन आलेला टेम्पो दुकाना समोर उभा केला. या किरकोळ वादातून हाणामारी होऊन एक व्यापारी गंभीर जखमी झाला. जखमी व्यापाऱ्यांवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून युटीए व्यापारी संघटनेने व्यापाऱ्यांच्या हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी अश्या गुंडावर वेळीच कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत