लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:12 PM2024-06-22T12:12:41+5:302024-06-22T12:13:07+5:30

मध्य प्रदेशातील भाजपा महिला नेत्याची मीसिंग मिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे. 

Madhya Pradesh BJP leader Mamta Yadav has been missing from last 8 months | लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता

लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता

अशोकनगर - मध्य प्रदेशातील अशोक नगर जिल्ह्यातील भाजपाची महिला नेत्या विधानसभा निवडणुकीपासून बेपत्ता आहे. ११ सप्टेंबरला बनारसला जातेय असं सांगून त्या घरातून बाहेर पडल्या परंतु अद्याप त्यांचा पत्ता नाही. प्रयागराज येथे एका युवतीचा मृतदेह सापडला, तिच्या शरीरावरही टॅटू आहेत त्यामुळे हा मृतदेह अशोक नगरहून बेपत्ता असलेल्या ममता यादव यांचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे ८ महिन्यांनी ममता यादव यांच्या बेपत्ता प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपा नेत्या ममता यादव या ११ सप्टेबरला घरातून बनारसला फिरायला जाते म्हणून बाहेर पडल्या. त्या अशोक नगरच्या चंदेरी येथे राहणाऱ्या होत्या. २-३ दिवसापर्यंत ममता यादव या त्यांच्या भावाशी फोनवरून संपर्कात होत्या परंतु त्यानंतर संपर्क तुटला. २५ सप्टेंबर २०२३ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मांडाजवळ एक मृतदेह सापडला हा मृतदेह ममता यादव यांचा असल्याचं बोललं गेले. 

या प्रकरणी अशोकनगरचे एसपी विनीत कुमार जैन यांनी सांगितले की, प्रयागराज येथे जो मृतदेह सापडला त्याच्या शरीरावर टॅटू होते. त्यामुळे हा मृतदेह ममता यादव यांचा असावा अशी शक्यता आहे परंतु अंतिम स्पष्टता नाही. जेव्हा ममता यादव यांच्या कुटुंबातील कुणाशी डिएनए चाचणी केली जाईल तेव्हा हे स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलं. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२३ रोजी दोनदा चंदेरी पोलीस प्रयागराजला गेली परंतु दोन्ही वेळा हाती निराशा आली. मृतदेह मिळाल्यापासून पुढील ३० दिवस तपास केला परंतु त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलीस नियमानुसार मृतदेह दफन करण्यात आला. 

सोशल मीडियावर ममता यादव सक्रीय

ममता यादव गायब होऊन आता ८ महिने उलटले तरीही पोलिसांसाठी ही केस मीसिंग मिस्ट्री बनली आहे. ममता जिवंत आहे की मृत याबाबत पोलिसांनी स्पष्टता दिली नाही. परंतु ममता यादव नेहमी त्यांच्या लग्झरी लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांमध्ये त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भाजपाच्या स्थानिक महामंत्री म्हणून त्या काम करायच्या. 
 

Web Title: Madhya Pradesh BJP leader Mamta Yadav has been missing from last 8 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.