Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटनेतील 4 आरोपी अद्याप फरार, विकसकाची माणगाव न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 21:00 IST2020-08-31T20:58:04+5:302020-08-31T21:00:06+5:30
Mahad Building Collapse : याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटनेतील 4 आरोपी अद्याप फरार, विकसकाची माणगाव न्यायालयात धाव
रायगड : महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील 4 आरोपींचा पोलिसांना अद्याप थांगपत्ता लागलेला नाही, आरोपींना पकडण्यात उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे,
विकसक (बिल्डर) फारुक काझी याने माणगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, 3 सप्टेंबर रोजी अर्जावर सुनावणी होणार आहे, बांधकाम व्यावसायिक युनूस अब्दुल रज्जाक शेख (रा. खारकांड मोहल्ला, महाड) आणि आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे हे न्यायालयीन कोठडीत आहेत, याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली हाेती. या दुर्घटनेत 16 रहिवाशांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले. विकासक (बिल्डर) फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे आणि युनूस अब्दुल रज्जाक शेख यांच्यावर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता