Mahad Building Collapse : दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:54 PM2020-08-25T14:54:30+5:302020-08-25T14:55:47+5:30
आविष्कार देसाई रायगड - महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दाेषींवर महाड शहर पाेलिस ठाण्यात सदाेष मनुष्य वधाचा ...
आविष्कार देसाई
रायगड - महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दाेषींवर महाड शहर पाेलिस ठाण्यात सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप काेणालाही अटक करण्यात आलेले नाही. आराेपींच्या शाेधार्थ पाेलिसांचे पथक विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले आहे.
बिल्डर फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
दरम्यान, इमारत दुर्घटनेची काेकण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिकेचे अधिकारी यांची एक चाैकशी समिती नेमण्यात आली आहे. दाेषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिची रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकेर यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.