महाड इमारत दुर्घटना प्रकरण; मुख्य आरोपी फारूक काझी शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:59 AM2020-09-04T01:59:21+5:302020-09-04T02:00:42+5:30
२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता.
महाड : महाडच्या तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी फारूक काझी हा अखेर गुरुवारी न्यायालयाला शरण आला. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती; परंतु त्यापूर्वीच तो न्यायालयासमोर हजर झाला. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यातील पाचपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे व फारूकचा सहकारी युनुस शेख या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचे बळी गेले होते, तर ४३ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन ही सर्व कुटुंबे बेघर झालेली आहेत.