लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:02 PM2020-05-28T13:02:20+5:302020-05-28T13:03:38+5:30

यावेळी कोरोना साथीच्या अटकाव करण्यासाठीच्या नियमांचेही दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे दाती महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharaja arrested for violating lockdown rules in delhi pda | लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

Next
ठळक मुद्देकाही व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात दाती महाराज शनिदेव मंदिरात काही भाविकांसह प्रार्थना करताना दिसले होते.दाती महाराजांवर भा. दं. वि. कलम १८८/३४ डीडीएमए अधिनियम ५४ बी आणि साथीच्या रोग अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी दाती महाराज यांना बुधवारी दिल्लीपोलिसांनीअटक केली. मात्र नंतर त्यांना जामीन मंजूर झाला. नुकतेच दाती महाराजांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. काही व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात दाती महाराज शनिदेव मंदिरात काही भाविकांसह प्रार्थना करताना दिसले होते. यावेळी एकतर सामाजिक अंतर पाळले गेले नाही. त्याचवेळी काही लोकांनी मास्क घातले नव्हते.

यावेळी कोरोना साथीच्या अटकाव करण्यासाठीच्या नियमांचेही दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे दाती महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ज्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे ते जामीनपात्र कलम आहेत, म्हणून पोलिसांनी दाती महाराजांना अटक केली आणि जामिनावर सोडले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना जे काही पुरावे सापडले ते दाती महाराजांच्या विरोधात होते. सुरुवातीच्या तपासणीदरम्यान हेही स्पष्ट झाले की केवळ दाती महाराजांच्या सांगण्यावरून मंदिरात जमाव जमला होता. दाती महाराजांच्या मंदिरासमोर पोलिसांना एक पोस्टर सापडले होते, ज्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, 22 मे रोजी शनी जयंती महोत्सवानिमित्त शनी मंदिरात जमा व्हा. म्हणजेच लॉकडाऊन दरम्यान हा कार्यक्रम दाती महाराजांनी आयोजित केला होता, ज्यांची परवानगीही घेण्यात आलेली नव्हती.

नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

 

प्रेयसीनं रात्री घरी बोलावणं ठरलं कर्दनकाळ; घरी जाताच झाली हत्या!


कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाऊन जारी केला आहे. लॉकडाऊनदरम्यान लोकांना सामाजिक अंतरांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि लोकांच्या जमावावर देखील बंदी घातली आहे. या दरम्यान हा धार्मिक कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. दाती महाराजांवर भा. दं. वि. कलम १८८/३४ डीडीएमए अधिनियम ५४ बी आणि साथीच्या रोग अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीएस मैदान गढी येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Maharaja arrested for violating lockdown rules in delhi pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.