हृदयद्रावक! 10 महिन्यांच्या लेकाचा मृतदेह घेऊन 'ती' पोलीस ठाण्यात; कारण ऐकून सर्वच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 10:19 AM2023-01-26T10:19:12+5:302023-01-26T10:19:49+5:30

चिमुकल्याचा मृतदेह घेऊन महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि पतीच्या क्रूरतेची माहिती दिली.

maharajganj woman reached police station with 10 month son dead body painful | हृदयद्रावक! 10 महिन्यांच्या लेकाचा मृतदेह घेऊन 'ती' पोलीस ठाण्यात; कारण ऐकून सर्वच हादरले

हृदयद्रावक! 10 महिन्यांच्या लेकाचा मृतदेह घेऊन 'ती' पोलीस ठाण्यात; कारण ऐकून सर्वच हादरले

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पती-पत्नीच्या वादातून 10 महिन्यांच्या निष्पाप मुलाची हत्या करण्यात आली आहे. चिमुकल्याचा मृतदेह घेऊन महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि पतीच्या या क्रूरतेची माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला काही वेळातच अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पारसमलिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंगटी गावात राहणारा चंद्रशेखर चौधरी उर्फ ​​झिनक नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यातील एका वीटभट्टीवर काम करतो. मंगळवारी रात्री तो नेपाळहून घरी पोहोचला. काही गोष्टीवरून पत्नीशी वाद झाला. त्यानंतर संतापलेली पत्नी आस्था चौधरी आपल्या दहा महिन्यांच्या निरागस मुलाला हातात घेऊन माहेरी जाऊ लागली. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात नवऱ्याने तिच्या मांडीवरचे बाळ हिसकावले आणि जमिनीवर आपटले. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर महिलेने लेकाचा मृतदेह घेऊन रडत पोलीस ठाणे गाठले. मृतदेह पोलीस ठाण्यात दाखवून संपूर्ण घटनेची माहिती दिली. हे दृश्य पाहून पोलीसही हादरले. रात्रीच पोलिसांनी छापा टाकून आरोपी पित्याला अटक केली आहे. 

याप्रकरणी स्टेशन ऑफिसर अमरेंद्र कुमार कन्नौजिया यांनी सांगितले की, 10 महिन्यांच्या निष्पाप मुलाच्या मृत्यूप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती चंद्रशेखर चौधरीला अटक करण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: maharajganj woman reached police station with 10 month son dead body painful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.