कमलेश तिवारी हत्येप्रकरणी एटीएसने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:00 PM2019-10-21T22:00:56+5:302019-10-21T22:04:20+5:30
नागपूर येथून केली आरोपीला अटक
मुंबई - उत्तर प्रदेशातील हिंदू संघटनेचा कार्यकर्ता कमलेश तिवारी याच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तिघांना सुरतहून अटक केली आहे. या संशयितांनी आपला गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हे दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी खंडन केले. यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटने झिंगाबाई टाकळी येथून सैय्यद असीम अली (२९) याला अटक केली आहे. सैय्यद हा हार्डवेअर दुकानाचा मालक आहे.
पोलिसांनी बिजनौरमधून मौलाना अनवर उल हक याला अटक केली होती. याशिवाय मौलाना मुफ्ती नईम काजमीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कमलेश तिवारीला ठार करणाऱ्यास दीड कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे २०१५ साली जाहीर केले होते. कमलेश तिवारीने प्रक्षोभक व आक्षेपार्ह भाषण केले होते. लखनौमध्ये कमलेश तिवारी यांची १८ ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. अटक केलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात सैय्यद असल्याने त्याचा मागावर एटीएसचे पथक होते. त्याला नागपूर येथून अटक करून चौकशी केली असता त्याचा या हत्याकांडात महत्वपूर्ण सहभाग असल्याचं चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली आहे. सैय्यदला नागपूर येथील कोर्टात हजर केले असता त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला आहे. त्याचा ताबा लवकरच उत्तर प्रदेश पोलीस घेणार आहेत.
कशी केली हत्या?
तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पैंगबरांवरील विधानामुळे ते चर्चेत होते. लखनौ खुर्शीद बाग येथील हिंदू समाज पार्टी कार्यालयात चहा पिण्याच्या बहाण्याने हल्लेखोर आले होते. मिठाईच्या डब्यात चाकू आणि देशी कट्टा घेऊन आले होते. येथे हल्लेखोराने तिवारी यांच्यावर हल्ला करत त्यांची गळा चिरून हत्या केली.
Confidential information was received by ATS, Nagpur Unit
— ANI (@ANI) October 21, 2019
regarding involvement of one suspect Sayyed Asim Ali, in murder of #KamleshTiwari. Based on the information ATS, Maharashtra conducted the operation and ATS, Nagpur unit inquired Sayyed Asim Ali.