महाराष्ट्र एटीएसची मोठ्या ड्रग रॅकेटवर कारवाई सुरु, हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापेमारी
By पूनम अपराज | Published: January 5, 2021 05:58 PM2021-01-05T17:58:15+5:302021-01-05T17:59:48+5:30
Maharashtra ATS : या छाप्यात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.
शिमला - महाराष्ट्रएटीएसने मोठ्या ड्रग रॅकेटवर कारवाई दणक्यात सुरु केली आहे. एटीएसने मंगळवारी हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले असून अजूनही छापेमारी सुरू आहे. या छाप्यात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.
पुण्यात केलेल्या दोन अटकेच्या कारवाईनंतर हिमाचल प्रदेशातील धागेदोरे सापडले
प्राथमिक माहितीनुसार गेल्या महिन्यात पुण्यात ड्रग नेटवर्कच्या दोन आरोपींना अटक झाल्यानंतर हिमाचल प्रदेशचा ड्रग अँगल उघडकीस आला होता. पुणे पोलिसांनी हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग केला. एटीएस गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात हिमाचल प्रदेशातील ड्रग अँगलची चौकशी करीत आहेत.
लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे
नवीन वर्षाच्या आधी या शहरांमध्ये चरस पोचवायचे होते
पुणे रेल्वे पोलिसांनी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमधील दोन तरुणांना 34 किलो चरस ठेवल्याबद्दल अटक केली. ललितकुमार शर्मा (४९) आणि कौलसिंग सिंग उर्फ भारद्वाज (४०) या दोघांकडून ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केले होते. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना गोवा, मुंबई आणि अन्य शहरांमध्ये चरस पोहचवायचे असल्याचे चौकशीत उघड झाले.