Terror module in Mumbai: दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 09:24 AM2021-09-18T09:24:36+5:302021-09-18T09:28:55+5:30

Terror module in Mumbai: जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले.

Maharashtra ATS taken a person into custody from Jogeshwari; terror module busted by Delhi Police | Terror module in Mumbai: दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ

Terror module in Mumbai: दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ

Next

महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. झाकीर असे या व्यक्तीचे नाव असून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांसोबत त्याचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. (A joint team of Maharashtra ATS and Mumbai Police Crime Branch has taken a person into custody from Jogeshwari area of the city in connection with the terror module busted by Delhi Police earlier this week: Maharashtra ATS)

जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दिल्लीच्या स्पेशल सेलने जानची चौकशी केली, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसला याची माहिती देण्यात आली होती. त्याला त्याच्या घरातूनच उचलण्यात आले. 


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठ्या दहशतवादी कटाचा उलगडा केला. सणासुदीच्या काळात हे दहशतवादी भारतात हल्ला करणार होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमला गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती. वेगवेगळ्या राज्यांतून 6 लोकांना अटक करण्यात आली होती. यापैकी दोघे पाकिस्तानहून ट्रेनिंग घेऊन आले होते. 
अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ अनीस यासाठी पैसे पुरवत होता. पाकिस्तानची आयएसआय या लोकांना ट्रेनिंग देत होती. त्यांना अल कायदा, अंडरवर्ल्ड आणि आयएसआयएसची मदत मिळत होती. अनीस या हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे देत असल्याचे समोर आले आहे. आयएसआयएस या दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवित होता. 

Read in English

Web Title: Maharashtra ATS taken a person into custody from Jogeshwari; terror module busted by Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.