महाराष्ट्र निवडणूक २०१९: तुर्भे येथे शिवसेनेच्या शाखेची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:39 PM2019-10-21T14:39:24+5:302019-10-21T14:44:59+5:30
लवकरच शिवसैनिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
नवी मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना राजकीय पक्षांनी मतदाराला घराबाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच राजकीय द्वेषातून तुर्भे स्टोअर येथील शिवसेनेच्या शाखेची तोडफोड करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी शिवसैनिक शाखेच्या ठिकाणी गेले असता ही बाब निदर्शनास आली.
तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखेत तोडफोड झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र, आपसातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. शहरात विधानसभा निवडणुकीची रंगत चढत असतानाच सोमवारी मतदानाच्या दिवशी सकाळी हा प्रकार उघड झाला. यामुळे राजकीय दृष्टिकोनातून या प्रकाराकडे पाहिले जात होते. या प्रकाराची चर्चा परिसरात पसरताच तणाव निर्माण झाला होता. मात्र, कार्यकत्र्याच्या आपसातील वादातून हा प्रकार घडला असल्याने संबंधितांनी तक्रार केलेली नसल्याचे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. सोमवारी सकाळी काही शिवसैनिक तिथल्या शाखेकडे गेले असता, आतमधील टेबल, खुर्ची तसेच टीव्ही फुटल्याचे आढळून आले. या प्रकरणी चौकशीदरम्यान रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी काही कार्यकर्ते बसलेले होते. त्यांच्यात आपसात वाद झाला असता धक्काबुक्कीमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.
नवी मुंबई - तुर्भे स्टोअर येथील शिवसेनेच्या शाखेची तोडफोड https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 21, 2019