कुटुंबातील १६ जणांच्या हत्येचा होता प्लॅन; २० दिवसांत ५ संपवले, नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 01:37 PM2023-10-21T13:37:39+5:302023-10-21T13:38:05+5:30

पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत.

Maharashtra Gadchiroli Women Poison: The plan was to kill 16 members of the family; 5 Family Member Over 20 Days | कुटुंबातील १६ जणांच्या हत्येचा होता प्लॅन; २० दिवसांत ५ संपवले, नवा खुलासा

कुटुंबातील १६ जणांच्या हत्येचा होता प्लॅन; २० दिवसांत ५ संपवले, नवा खुलासा

गडचिरोली – जिल्ह्यात घडलेल्या ५ जणांच्या हत्याकांडामुळे राज्यात तसेच देशभरात चर्चा आहे. २ महिलांनी मिळून २० दिवसांत कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केली. या हत्या हळूहळू कुणालाही संशय येऊ नये अशा केल्या. अखेर पोलिसांनी २ महिलेला अटक केली. कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून हत्या करण्यात आली. या महिलांनी जेवणात आणि पाण्यात हे मिसळले होते. एका आरोपीला तिचा पती आणि सासरच्यांकडून सतत टोमणे मारले जात होते म्हणून तिने क्रूर कृत्य केले तर दुसऱ्या महिलेला वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद झाला होता म्हणून या दोन्ही महिला आरोपींनी १६ जणांना मारण्याचं प्लॅनिंग आखल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

२६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. एका पाठोपाठ एका कुटुंबातील ५ लोकांची हत्या झाल्याने सगळेच हैराण झाले होते. हे सर्व मृत्यू नैसर्गिक वाटत होते. मृत लोकांच्या शरीरात वेदना, पाठीच्या खालील बाजून आणि डोके प्रचंड दुखू लागले, त्यामुळे उपचारावेळी यांचा मृत्यू झाला. २० सप्टेंबरला महागावातील शंकर कुंभारे आणि पत्नी विजया कुंभारे आजारी पडले. २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरला त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी शंकर यांचा मुलगा रोशन, मुलगी कोमल, आनंद यांनाही हीच लक्षणे जाणवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तिघांनी ८ ते १५ ऑक्टोबर काळात जीव सोडला.

कुटुंबाची अडचण आणखी वाढली जेव्हा शंकर यांचा दुसरा मुलगा सागर हा आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून आला होता. घरी परतल्यानंतर तोदेखील आजारी पडला. शंकर आणि विजया यांना चंद्रपूरला घेऊन जाणारा चालकही आजारी पडला. कुटुंबाच्या मदतीला आलेला एक नातेवाईकही अशाच लक्षणांनी आजारी पडला. त्याला हॉस्पिटलला दाखल करावे लागेल. जेव्हा डॉक्टरांना विषबाधेचा संशय आला मात्र प्राथमिक तपासात याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत.

धोतराच्या बियाच्या विषारी द्रवाचा पहिला प्रयोग फसल्यानंतर संघमित्रा रामटेकेने इंटनेवर दर्प व रंग नसलेले द्रव शोधून काढले. हे द्रव तिला रोझा रामटेकेने उपलब्ध करून दिले. रोझाचे माहेर तेलंगणातील कागझनगर आहे. तेथून तिने हे द्रव मागविले असावे, असा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. रोझाच्या संपर्कात नेमके कोण होते, याबाबत चौकशी सुरू असून, त्यानंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra Gadchiroli Women Poison: The plan was to kill 16 members of the family; 5 Family Member Over 20 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.