२० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अडकल्या सापळ्यात

By काशिनाथ वाघमारे | Published: May 30, 2023 08:29 PM2023-05-30T20:29:33+5:302023-05-30T20:30:06+5:30

त्यामध्ये तडजोड करून २० हजार देण्याचे ठरले. 

Mahila Mandal officials caught in the trap while accepting a bribe of 20,000 for heir registration | २० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अडकल्या सापळ्यात

२० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अडकल्या सापळ्यात

googlenewsNext

सोलापूर :  वारस नोंदीसाठी दाखल तक्रारी अर्जावर सुनावणी घेऊन निकाल बाजूने देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना करमाळा तहसील  कार्यालयातील महिला मंडल अधिकारी लाच लुचपतच्या सापळ्यात अडकल्या. शाहिदा युनूस काझी (वय ४२, मंडल अधिकारी) असे त्यांचे नाव आहे. 
यातील तक्रारदाराने वारस नोंदीसाठी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यामध्ये तडजोड करून २० हजार देण्याचे ठरले. 

दरम्यान तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे याबाबत तक्रार नोंदविली. तसेच लाचेची रक्‍कम जेऊर येथील मंडल कार्यालयात स्वतः स्वीकारली. तत्पूर्वी पथकाने सापळा लावला होता. त्या सापळ्यात शाहिदा अडकल्या. करमाळा पोलिस ठाण्यात शाहिदा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, सलिम मुल्ला, शाम सुरवसे यांनी केली.

Web Title: Mahila Mandal officials caught in the trap while accepting a bribe of 20,000 for heir registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.