लुटेरी दुल्हन! लग्नाच्या 4 दिवसानंतर नववधूने कुटुंबीयांना दुधातून दिलं विष; दागिने घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:24 PM2023-03-20T12:24:49+5:302023-03-20T12:25:37+5:30

नववधूने लग्नाच्या चार दिवसांनंतर सासरच्या मंडळींना दुधातून विष पाजून लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे.

mahoba newly wed bride looted her husband family and took away cash and gold | लुटेरी दुल्हन! लग्नाच्या 4 दिवसानंतर नववधूने कुटुंबीयांना दुधातून दिलं विष; दागिने घेऊन पसार

लुटेरी दुल्हन! लग्नाच्या 4 दिवसानंतर नववधूने कुटुंबीयांना दुधातून दिलं विष; दागिने घेऊन पसार

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये एका नववधूने लग्नाच्या चार दिवसांनंतर सासरच्या मंडळींना दुधातून विष पाजून लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. पैशांनी भरलेली बॅग घेऊन नवरी बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दुसरीकडे, सासरच्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वधूला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महोबाच्या चरखारी नगरपरिषदेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले अरविंद खरे यांचं 14 मार्च रोजी लग्न झाले होते. अरविंदचा विवाह बाबुलाल तिवारी कुसियारी भटियार, जिल्हा मिर्झापूर, रहिवासी मिर्झापूर, उत्तर प्रदेश यांच्या मुलीशी चंद्रिका देवी मंदिरात हिंदू रितीरिवाजाने झाला होता. लग्नानंतर चार दिवसांनी नववधूने सासरच्या सगळ्यांना दुधात विष टाकून बेशुद्ध केल्याचा आरोप आहे. 

लग्नादरम्यान देण्यात आलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन नवरी फरार झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी नववधूला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. अद्याप आरोपी नवरीचा शोध लागलेला नाही. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mahoba newly wed bride looted her husband family and took away cash and gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.