BSFची मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर चीनी गुप्तहेराला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:51 PM2021-06-11T21:51:03+5:302021-06-11T21:51:37+5:30
Major action of BSF :जुनवेई याच्या एका साथीदाराला उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने अटक केली आहे.
बीएसएफने बांगलादेश सीमेवरुन बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला अटक केली. हा चीनी नागरिक पश्चिम बंगालच्या मालदामध्ये प्रवेश करताना अटक करण्यात आली. हा चीनी नागरिक गुप्तहेर होता हे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. त्याचे नाव हान जुनवेई (३६) आहे. जुनवेई गैर हेतूने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनी गुप्तहेराचा अंगझडती केली असता त्याच्याकडे, चायनीज पासपोर्ट, एक अॅपल लॅपटॉप, २ आयफोन मोबाइल, १ बांगलादेशी सिम, १ भारतीय सिम, २ चीनी सिम, २ पेन ड्राईव्ह, ३ बॅटरी, दोन लहान टॉर्च, ५ पैशांचे व्यवहार मशीन, २ एटीएम कार्ड, यूएस डॉलर अन्य वस्तू सापडल्या. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, २०१० साली तो प्रथम हैदराबादला आला होता. त्यानंतर तो २०१९ नंतर तीनदा दिल्ली-गुरुग्राम येथे आला होता. त्याचा सध्याचा पासपोर्ट चीनच्या हुबेई प्रांताचा आहे.
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे लागलं झुकावं; कुलभूषण जाधव अपील दाखल करू शकणार https://t.co/MMov9wPF2h
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2021
जुनवेई याच्या एका साथीदाराला उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने अटक केली आहे. चौकशीदरम्यान हान जुनवेई याने त्याचा साथीदार दरमहा १०-१५ भारतीय सिम कार्ड चिनमध्ये पाठवत होता असा खुलासा केला आहे. पुढे जुनवेई यांनी सांगितले की, गुरुग्राममध्ये त्याचे एक हॉटेल आहे, ज्यात इतर अनेक चीनी नागरिक कार्यरत आहेत.