गँगरेपच्या आरोपींवर मोठी कारवाई, बुलडोझर चालवला अन् घरं केली जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:43 PM2022-03-20T20:43:22+5:302022-03-20T20:44:08+5:30

Gangrape Case : गँगरेपच्या आरोपींची नावे मोहसीन, रियाज आणि सेहबाज अशी आहेत. ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत.

Major action taken against gangrape accused, bulldozer driven and houses demolished | गँगरेपच्या आरोपींवर मोठी कारवाई, बुलडोझर चालवला अन् घरं केली जमीनदोस्त

गँगरेपच्या आरोपींवर मोठी कारवाई, बुलडोझर चालवला अन् घरं केली जमीनदोस्त

Next

मध्य प्रदेशातील श्योपूर येथे १७ मार्च रोजी एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपींनी जमिनीवर बांधलेली बेकायदा घरे आणि पिके जमीनदोस्त केली आहेत. असे करून पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना कडक संदेश दिला. गँगरेपच्या आरोपींची नावे मोहसीन, रियाज आणि सेहबाज अशी आहेत. ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत.

श्योपूरच्या बाळापुरा टाऊनशिपमध्ये पोलिसांसह प्रशासन, महसूल विभाग आणि पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू करताच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गँगरेप प्रकरणातील आरोपींची घरे प्रशासनाने २४ तासांत जेसीबी मशिनच्या सहाय्याने एक एक करून पाडली.

जेसीबीने उभे पीक नष्ट केले

यानंतर प्रशासनाने पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या एका आरोपीच्या 2 बिघा जमिनीवरील गव्हाचे पीक नष्ट केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी या कारवाईचा व्हिडिओही बनवला.

आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोक उत्तर प्रदेशच्या धर्तीवर गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी करू लागले. दरम्यान, प्रशासनाने कारवाईला हिरवा  झेंडा दाखवला आणि त्यानंतर गँगरेपच्या आरोपींची घरे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.

विशेष म्हणजे अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत जंगलात फिरायला गेली होती. त्यादरम्यान तीन तरुण तेथे पोहोचले आणि तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडवून ते फरार झाले. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक केली.

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या जबाबानुसार, ती सकाळी तिच्या गावावरून नातेवाईकाच्या घरी जात होती. यादरम्यान तिचा मित्र भेटला आणि दोघेही जंगलात फिरायला गेले. त्याच गावातील रहिवासी असलेले तीन आरोपी मोहसीन, रियाज आणि सेहबाज तेथे पोहोचले आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागले. तिचा मित्र घाबरून पळून गेला आणि तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला.

Web Title: Major action taken against gangrape accused, bulldozer driven and houses demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.