अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 07:11 PM2020-01-05T19:11:34+5:302020-01-05T19:14:58+5:30
या हल्ल्याप्रकरणी ५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
नैरोबी - रविवारी सकाळी सोमालियाच्या इस्लामिक दहशतवादी संघटनेने अल-शबाबने केनियाच्या लामा काउंटी येथे अमेरिकन एअरबेसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ विमाने आणि ३ वाहने उध्वस्त करण्यात आली आहेत. मात्र, या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झालेली नाही. लामू काउंटीचे आयुक्त इरुंगा मचारिया यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्याप्रकरणी ५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
केनियाच्या लामू काउंटीच्या 'मंदा बे' मध्ये अमेरिका आणि केनियाच्या संयुक्त लष्करी विमानतळ आहेत. पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० अमेरिकन सैनिक लष्करी छावणीत आहेत. अल शबाबच्या प्रवक्त्याने अल जझिराला या मीडिया समूहाला सांगितले की, हल्ल्याचा मध्य-पूर्वेतील (अमेरिका - इराण) सुरू असलेल्या वादाशी काही संबंध नाही.
सोमालियामध्ये ट्रक बॉम्बने ७९ जणांचा बळी घेतला
सोमालियातून कार्यरत अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा संबंध अल - कायदयाशी आहे. यापूर्वी त्याने केनियावर अनेक वेळा हल्ला केला आहे. एका आठवड्यापूर्वी त्याने सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशु येथे ट्रक बॉम्बद्वारे हल्ला केला होता, त्यात ७९ जण मृत्युमुखी पडले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
सप्टेंबरमध्येही अमेरिकेच्या तळावर हल्ला केला
सप्टेंबर २०१९ मध्ये अल-शबाबने सोमालियातील अमेरिकन सैन्याच्या तळावर हल्ला केला. हा हल्ला मोगादिशुच्या वायव्येस 110 कि.मी. अंतरावर असलेल्या बालेदोगले येथे अमेरिकेच्या ठिकाणावर करण्यात आला. तेथे बंदूकधार्यांनी गोळीबारही केला होता. त्यानंतर युरोपियन युनियनच्या (ईयू) सल्लागारांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला. मात्र, दोन्ही हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
This morning at around 5:30 am an attempt was made to breach security at Manda Air Strip. The attempted breach was successfully repulsed. Four terrorists bodies have so far been found. The airstrip is safe.https://t.co/CXoAWBgXC4
— Kenya Defence Forces (@kdfinfo) January 5, 2020