CBIची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:15 PM2022-05-26T20:15:19+5:302022-05-26T21:08:47+5:30

Avinash Bhosale Arrested : डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातून ही अटक करण्यात आली आहे. 

Major CBI action; Builder Avinash Bhosale arrested in pune | CBIची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

CBIची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

googlenewsNext

पुणे : व्यावसायिक अविनाश भोसलेंवर (Avinash Bhosale) CBI ने छापेमारी केलेली होती. येस बॅंक आणि DHFLघोटाळयाप्रकरणी भोसलेंच्या मुंबई आणि पुणे येथील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आलेले होते. आज प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet kadam) यांचे सासरे अविनाश भोसले यांना सीबीआयकडून (CBI)  अटक करण्यात आली आहे. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातून ही अटक करण्यात आली आहे. 

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तसेच मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती.

Read in English

Web Title: Major CBI action; Builder Avinash Bhosale arrested in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.