वाकडमध्ये खून लपविण्यासाठी केला अपघाताचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 02:28 PM2019-04-13T14:28:19+5:302019-04-13T14:29:50+5:30

बहिणीचा फरशीवर डोके आपटून खून केला . मात्र  तिच्या विमा पॉलिसीचे ३० लाख रुपये मिळावे म्हणून भावाने हा मृत्यु अपघाती असल्याचे भासविले .

To make the accident a crime to hide the murder | वाकडमध्ये खून लपविण्यासाठी केला अपघाताचा बनाव

वाकडमध्ये खून लपविण्यासाठी केला अपघाताचा बनाव

Next
ठळक मुद्देभावानेच केला बहिणीचा खून 

पिंपरी : बहिणीचा फरशीवर डोके आपटून खून केला . मात्र तिच्या विमा पॉलिसीचे ३० लाख रुपये मिळावे म्हणून भावाने हा अपघाती मृत्युअपघाती असल्याचे भासविले . दरम्यान, एका निनावी अजार्मुळे तब्बल ६ महिन्यांनंतर खुनाची घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलिसांनी भावाला अटक केली. 
जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०, रा. सौदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेत त्याची बहिण संगीता मनिष हिवाळे हिचा मृत्यु झाला. ही घटना ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरात घडली होती.
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन बोर्डे आणि संगीता हिवाळे हे बहीण भाऊ आहेत. पतीबरोबर भांडणे झाल्याने संगीता जॉनच्या घरी राहत . दरम्यान, त्या वारंवार पैसे मागत असल्यावरुन त्यांच्यात भांडणे होत असत. ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री नऊच्या सुमारास जॉनकडे खचार्साठी पैसे मागितले. यावरुन त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा त्याने बहिणीचे डोके जोरात फरशीवर आपटले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.  मृत्युबद्दल घरातील कोणाला शंका येऊ नये म्हणून हा मृत्यु अपघाती झाला आहे, हे दाखविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच  संगीता यांचा ३० लाख रुपयांचा विमा उतरविला होता. ते पैसेही मिळतील या हेतूने जॉन ने आपल्या कारमधून त्यांना  उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असल्याचे भासवले व संगिता, आई आणि 
भाचा सायमन यांना बरोबर घेतले. तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ असे सांगून त्याने गाडी वाकड येथील सयाजी हॉटेलचे समोरील महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आणली आणि गाडी बंद करुन तिच्यात बिघाड झाल्याचा बहाणा केला. आईला खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर गाडीचे बॉनेट उघडून त्याने तेथे सायमनला थांबायला सांगितले. त्यानंतर गाडीत ठेवलेले पेट्रोल बहिण संगीता हिच्या अंगावर व गाडीत इतरत्र फेकून लाईटरने पेटवून दिले. त्याबरोबर गाडीने पेट घेतला. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे दाखवून त्याने हा खुनाचा प्रकार पचविण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले. त्यात हा अपघात नसून खून असल्याचे म्हटले होते. त्यावरुन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला.

Web Title: To make the accident a crime to hide the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.