मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:20 AM2024-09-12T06:20:59+5:302024-09-12T06:21:25+5:30

बराच वेळ होऊनही ते न परतल्याने त्यांच्या पत्नी जॉयस यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले असता, अनिल यांची चप्पल त्यांना दिसली.

Malaika stepfather suicide or accidental death?; Police are investigating | मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू

मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू

मुंबई - चित्रपट अभिनेत्री मलाइका अरोरा यांचे सावत्र वडील अनिल मेहता अरोरा (६२) यांचा बुधवारी सकाळी वांद्रे येथील आयेशा मॅनर सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला, तरी ते चक्कर आल्याने तोल जाऊन पडले का, या अनुषंगानेही तपास सुरू आहे. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजता घडली. 

अनिल मेहता पत्नी जॉयस यांच्याबरोबर वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यांनी चहा-नाश्ता उरकला आणि काही वेळाने उठून बाल्कनीत गेले. बराच वेळ होऊनही ते न परतल्याने त्यांच्या पत्नी जॉयस यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले असता, अनिल यांची चप्पल त्यांना दिसली. त्यांनी बाल्कनीतून खाली पाहिले असता, खाली अनिल निपचित पडले असल्याचे आणि सुरक्षारक्षकांचा आरडाओरडा सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. अनिल मेहता यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर या घटनेची माहिती सुरक्षारक्षकांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आणि पोलिसांनाही कळवले. पोलिसांनी अनिल यांना भाभा रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

 

Web Title: Malaika stepfather suicide or accidental death?; Police are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.