मलंगगड परिसरात दोन तरुण-तरुणींना मारहाण, कपडे तोकडे घातल्याचे सांगत तरुणीचे फाडले कपडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 11:28 AM2021-08-05T11:28:58+5:302021-08-05T11:31:01+5:30

Crime News: झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर तीन दिवसांनी ६ जणांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

In Malanggad area, two youths were beaten and their clothes were torn | मलंगगड परिसरात दोन तरुण-तरुणींना मारहाण, कपडे तोकडे घातल्याचे सांगत तरुणीचे फाडले कपडे

मलंगगड परिसरात दोन तरुण-तरुणींना मारहाण, कपडे तोकडे घातल्याचे सांगत तरुणीचे फाडले कपडे

Next

उल्हासनगर : निसर्गरम्य मलंगगड परिसरात रविवारी फिरण्यास गेलेल्या दोन तरुण-तरुणींना ६ जणांच्या टोळक्याने अडवून मारहाण केली. त्या चौघांनी झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर तीन दिवसांनी ६ जणांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली येथील राहणारे उच्चशिक्षित असलेली दोन तरुण-तरुणी रविवारी मलंगगड येथील कुशिवली गाव परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळी ६ जणांच्या टोळक्यांनी त्यांना अडवले व त्या तरुणीने तोकडे कपडे घातले म्हणून मारहाण केली. तसेच तरुणीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या त्या चौघांनी कशीबशी सुटका करून नेवाळी नाका पोलीस चौकी गाठली. झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता, त्या तरुण-तरुणींच्या हातात मेमो देऊन प्रथम वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयास जाण्यास सांगितले. मानसिक धक्का बसलेल्या तरुण-तरुणींनी मध्यवर्ती रुग्णालयाऐवजी घर गाठले. सोमवारी त्या तरुण-तरुणींनी हिललाइन पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र यावेळीही पोलिसांनी तक्रार न नोंदविता त्यांना प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. अखेर वैतागलेल्या त्या चौघांनी झालेल्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केल्याने, हा प्रकार सर्वत्र उघडकीस आला. त्यानंतर हिललाइन पोलिसांनी मंगळवारी तरुण-तरुणींना बोलावून त्या टोळक्यातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.  

टोळक्याच्या शोधासाठी दोन पथके स्थापन
 पोलिसांनी या सहा जणांच्या टोळक्याच्या शोधासाठी दोन पथके स्थापन केली. तरुणतरुणींनी वैद्यकीय तपासणी करून हिललाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांच्या विलंबामुळे गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: In Malanggad area, two youths were beaten and their clothes were torn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.