मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : एनआयए कोर्टाने प्रज्ञासिंग ठाकूर यांना दिला दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 15:39 IST2019-06-03T15:38:11+5:302019-06-03T15:39:28+5:30
साध्वी वगळता मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील अन्य आरोपी कोर्टात हजर झाले आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : एनआयए कोर्टाने प्रज्ञासिंग ठाकूर यांना दिला दणका
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित रहाण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले होते. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे. आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. तर आज मालेगाव खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. खासदार म्हणून संसदेच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी परवानगी मागितली होती. साध्वी वगळता मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील अन्य आरोपी कोर्टात हजर झाले आहेत.
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : एनआयए कोर्टाने प्रज्ञासिंग ठाकूर यांचा कोर्टात सुनावणीदरम्यान हजार न राहण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2019