मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 04:28 PM2019-10-30T16:28:44+5:302019-10-30T16:30:35+5:30

जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. 

Malegaon bombblast case: Armed guard deployed for security of suspected accused who isoutside bail | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

Next
ठळक मुद्देसंशयित आरोपी समीर कुलकर्णी यांची ऑक्टोबर २०१७ मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. समीर कुलकर्णी यांच्या पुण्यातील पिंपरी - चिंचवड येथील निवास्थानी हा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे.

पुणे - २००८ साली झालेल्या मालेगांव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एक शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आला आहे. समीर कुलकर्णी यांच्या पुण्यातील पिंपरी - चिंचवड येथील निवास्थानी हा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. 

त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी आणि सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या समीर कुलकर्णींनी सुरक्षा पुरविण्यात आली आहे. संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांची ऑक्टोबर २०१७ मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने ९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ५० हजारांचा जातमुचलक्यावर त्यांची सुटका करत मोठा दिलासा दिला होता.

मालेगावात सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या दुचाकी बॉम्बस्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच शंभरपेक्षा अधिक जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह १२ जणांना संशयित म्हणून अटक केली होती. भोपाळ येथे राहणारे समीर कुलकर्णी हे छपाई कामगार होते. मालेगाव बॉम्बस्फोटासाठी त्याने केमिकलचा पुरवठा केल्याचे तसेच बॉम्बस्फोटासाठी नाशिक आणि इंदूर येथे झालेल्या बैठकीत त्याने सहभाग घेतल्याचे त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहे. 


 

Web Title: Malegaon bombblast case: Armed guard deployed for security of suspected accused who isoutside bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.