पीयूष गोयल यांच्या घरात चोरी, महत्वाची कागदपत्रे लीक झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 09:07 AM2019-10-03T09:07:15+5:302019-10-03T14:17:28+5:30
पीयूष गोयल यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
मुंबई : केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराने त्यांच्या मुंबईतील घरी चोरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नोकराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष गोयल यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गेल्या महिन्यात पीयूष गोयल यांच्या कुटुंबीयांना घरातील वस्तू आणि चांदीची भांडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घरातील नोकर विष्णु कुमार विश्वकर्मा याच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना 16 ते 18 सप्टेंबर दरम्यानची आहे.
Mumbai: Police has arrested a man, Vishnu Kumar Vishwakarma, accused of committing theft on May 16 at the residence of Union Minister Piyush Goyal. The accused is in judicial custody now. #Maharashtra (file pic) pic.twitter.com/P6DvrYlJAl
— ANI (@ANI) October 2, 2019
दरम्यान, पोलिसांनी आरोपी विष्णु कुमार विश्वकर्मा याला अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून पीयूष गोयल यांच्या घरी काम करत होता. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल आणि काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच, मोबाइल सायबर सेलकडे पाठविला असून त्याच्याकडून डिलीट करण्यात आलेल्या मेलची रिकव्हरी करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.