घरातूनच करायचा बनावट नोटांची छपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 10:11 PM2019-10-18T22:11:09+5:302019-10-18T22:11:33+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Next
मुंबई - घरातूनच बनावट नोटांची छपाई करणाऱ्या सुनील भोईर याला चारकोप येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून 2 लाख 47 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्याने यापैकी बऱ्याच नोटा बाजारात वितरित केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष 5 ने ही कारवाई केली असून अधिक तपास सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.