धक्कादायक! 'हिंदुस्तान झिंदाबाद' वदवून घेण्यासाठी दिल्लीत एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:50 PM2021-03-25T21:50:25+5:302021-03-25T21:55:32+5:30

Assaulting Case : मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी हल्लेखोराला अटक केली.

Man assaulted, forced to chant 'Hindustan Zindabad' slogans in Khajuri Khas; one held | धक्कादायक! 'हिंदुस्तान झिंदाबाद' वदवून घेण्यासाठी दिल्लीत एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

धक्कादायक! 'हिंदुस्तान झिंदाबाद' वदवून घेण्यासाठी दिल्लीत एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Next
ठळक मुद्देजुने गढी गावचे रहिवासी आणि दुग्ध व्यवसायिक असलेल्या अजय गोस्वामी अशी आरोपीची माहिती

२०२० मध्ये झालेल्या दंगलीतील आरोपी असलेल्या एका व्यक्तीने उत्तर-पूर्व दिल्लीच्या खजुरी खास येथे एका व्यक्तीस मारहाण करून "हिंदुस्तान जिंदाबाद" आणि "पाकिस्तान मुर्दाबाद" अशी जबरदस्तीने घोषणा देण्यास भाग पाडले होते, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी हल्लेखोराला अटक केली. जुने गढी गावचे रहिवासी आणि दुग्ध व्यवसायिक असलेल्या अजय गोस्वामी अशी आरोपीची माहिती असून पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या या हल्लेखोराची ओळख पटवली असल्याचे पोलिस उपायुक्त (ईशान्य) संजय कुमार साईन यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी म्हणाले की, गोस्वामी २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीतील एक आरोपी आहे, परंतु त्याने दंगलीत त्याच्या सहभागाचा या कथित हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दंगलीत सामील झालेल्या गोस्वामीच्या त्या प्रकरणाशी सद्यस्थितीचा काहीही संबंध नाही. पीडितेची ओळख पटली नसल्याचे साईन म्हणाले की, पीडित व्यक्तीची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि हा खून आणि दरोडा प्रकरणातील आरोपी आहे. आणखी एक पोलिस अधिकारी, ज्याने पीडित व्यक्तीची ओळख पटली नसल्याचे सांगितले. मात्र, पीडित व्यक्ती एक मुस्लिम माणूस आहे. मंगळवारी हा माणूस चोरी करण्याच्या उद्देशाने गोस्वामीच्या डेअरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता, जेव्हा त्याला पकडण्यात आले, असे पुढे अधिकारी म्हणाले.

Web Title: Man assaulted, forced to chant 'Hindustan Zindabad' slogans in Khajuri Khas; one held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.