शिव्या दिल्यामुळे संतापली व्यक्ती, दातांनी शेजाऱ्याच्या जिभेचा पाडला तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 09:26 AM2022-12-09T09:26:55+5:302022-12-09T09:27:15+5:30

Man Bites Neighbour Tongue: ही घटना आहे पंजाबमधील. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  मोहालीच्या डेरा बस्सीमध्ये दोन शेजाऱ्यांच्या भांडणावेळी हे सगळं झालं. गेल्या रविवारी ही घटना घडली.

Man bites neighbour tongue with his teeth after fight over bike car collision | शिव्या दिल्यामुळे संतापली व्यक्ती, दातांनी शेजाऱ्याच्या जिभेचा पाडला तुकडा

शिव्या दिल्यामुळे संतापली व्यक्ती, दातांनी शेजाऱ्याच्या जिभेचा पाडला तुकडा

Next

Man Bites Neighbour Tongue: अनेकदा काही लोकांमध्ये वाद इतका पेटतो की, त्यांच्यामध्ये हाणामारी होते. पण मारहाण करण्याऐवजी एका व्यक्तीने दुसऱ्याच्या जिभेचा तुकडा पाडला तर काय होईल. अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या जिभेचा तुकडा पाडला. त्यानंतर वाद आणखी पेटला.

ही घटना आहे पंजाबमधील. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  मोहालीच्या डेरा बस्सीमध्ये दोन शेजाऱ्यांच्या भांडणावेळी हे सगळं झालं. गेल्या रविवारी ही घटना घडली. एका स्थानिक शाळेजवळ हे भांडण झालं. दोन मित्र हरप्रीत आणि आसिफ त्यांच्या एका मित्राच्या लग्नाहून परत येत होते. रस्त्यात त्यांना त्यांच्या ओळखीचे आणखी काही लोक भेटले. तिथेच काही कारणावरून भांडण झालं.

सांगण्यात आलं आहे की, दोन कारच्या टक्करवरून हे भांडण झालं होतं. यादरम्यान हरप्रीतच्या शेजाऱ्याने आपल्या दातांनी हरप्रीतची जीभ कापली. त्याने हे कृत्य इतक्या भयानक पद्धतीने केलं की, जिभेचा तुकडाच पडला. त्याने सांगितलं की, हरप्रीत दारू पिऊन होता आणि त्याने शिवीही दिली. हे त्याला सहन झालं नाही आणि त्यामुळे त्याने हे केलं.

यानंतर कसंतरी व्यक्तीला जिभेसोबत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्याला PGI मध्ये रेफर करण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे तेथील डॉक्टरांनी सुद्धा त्याला पंचकुला येथे रेफर केलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केलं, पण जीभ जोडू शकले नाहीत. पीडितच्या कुटुंबियांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Man bites neighbour tongue with his teeth after fight over bike car collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.