मॉडलच्या घरात लपून राहत होता तरूण, रात्री बनवत होता तिचे प्रायव्हेट व्हिडीओ आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:01 PM2022-03-04T12:01:50+5:302022-03-04T12:03:49+5:30
या व्यक्तीला आता पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने स्वत: या घटनेचा खुलासा केला.
एका वेबसाइटवर भेट झाल्यापासून एका तरूणाने महिलेचा पाठलाग करणं सुरू केलं होतं. इतकंच नाही तर ६०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करून तो महिलेच्या घराच लपून शिरला होता. जेव्हा मॉडल झोपत होती तेव्हा तो रात्री तिचे फोटो काढत होता आणि व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. या व्यक्तीला आता पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने स्वत: या घटनेचा खुलासा केला.
ही घटना अमेरिकेतील New Hampshire ची आहे. नुकतीच २० वर्षीय मौरिसियो डेमियन-ग्येरेरो नावाच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. WCVB च्या रिपोर्टनुसार, Pennsylvania चा राहणारा ग्युरेरोची एका वेबसाइटवर महिलेसोबत ओळख झाली होती. यानंतर ग्युरेरोने त्या महिलेचा पाठलाग करणं सुरू केलं.
पाठलाग करता करता तो एक दिवस महिलेच्या घरात शिरला आणि लपून राहिला होता. ग्युरेरो ६४३ किलोमीटरचा प्रवास करून महिलेच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनुसार, त्याने महिलेचे झोपतानाचे फोटो काढले. इतकंच नाही तर त्याने महिलेच्या खाजगी क्षणांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.
ग्युरेरोला महिलेच्या घरातूनच अटक करण्यात आली. रिपोर्टनुसार, ग्युरेरोने पोलिसांसमोर हे मान्य केलं की, त्याने महिलेच्या कारला एक ट्रॅकिंग डिवाइस लावण्याचा प्लान केला होता. गेल्या सोमवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून ही बाब समोर आली.
आता ग्युरेरोला २ लाख रूपयांच्या जामीनावर सोडण्यात आलं. पण त्याच्यावर पाळत ठेवणार आहेत. त्याच्यावर न्यू हॅम्पशायर शहरातून बाहेर जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.