चिमुकला कारला टेकून उभा राहिल्याची मिळाली शिक्षा; मालकाने केलं असं काही...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 11:16 AM2022-11-05T11:16:26+5:302022-11-05T11:24:24+5:30

एक चिमुकला रस्त्यावर उभ्या असलेल्या एक कारला फक्त टेकला म्हणून त्याला शिक्षा मिळाली आहे.

man brutally kicks migrant boy off his car in kerala bjp questioned vijayan | चिमुकला कारला टेकून उभा राहिल्याची मिळाली शिक्षा; मालकाने केलं असं काही...; Video व्हायरल

चिमुकला कारला टेकून उभा राहिल्याची मिळाली शिक्षा; मालकाने केलं असं काही...; Video व्हायरल

googlenewsNext

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एक चिमुकला रस्त्यावर उभ्या असलेल्या एक कारला फक्त टेकला म्हणून त्याला शिक्षा मिळाली आहे. मुलगा कारला टेकून उभं राहिल्याचं पाहून कारचालक चांगलाचं संतापला आणि त्याने रागाच्या भरात मुलाला जोरात लाथ मारली. ही धक्कादायक घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या थल्लासरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. 6 वर्षांचा चिमुकला रस्त्यावर पार्क केलेल्या कारला टेकून उभा राहिला आहे. काही वेळाने कारचा मालक तिथे येतो आणि त्याचं लक्ष आपल्या कारला टेकलेल्या त्या मुलाकडे जातं. त्यानंतर तो मालक थेट मुलाला जोरात लाथ मारतो.

कारचालक मुलावर मोठमोठ्याने ओरडताना दिसत आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्यक्तीचं मुलासोबतचं संतापजनक कृत्य कैद झालं. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. केरळमधील भाजपाचे नेते के. सुरेंद्रन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला जात आहे. लाथ मारणाऱ्या या व्यक्तीचं नाव शिहशाद आहे. तो पोन्नयमपालममध्ये राहणारा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: man brutally kicks migrant boy off his car in kerala bjp questioned vijayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.