Monika Murder Case: जिच्याकडून राखी बांधून घेतली तिच्याशीच केलं लग्न, नंतर केला खून; थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 02:11 PM2023-04-06T14:11:55+5:302023-04-06T14:13:23+5:30
प्रेमात लोकं साऱ्या मर्यादा ओलांडतात, पण या प्रकरणात काहीतरी वेगळंच आणि अतिशय धक्कादायक घडलं...
Monika Murder Case: प्रेमात लोक कधी कधी सर्व मर्यादा ओलांडतात. प्रेमात जोडपी जगण्या-मरण्याच्या शपथा घेतात. पण कधी कधी हे प्रेम अशी फसवणूक करते की माणसाचं आयुष्य बरबाद होतं. श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर अशा अनेक घटना समोर आल्या, ज्यामध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केली होती. आतादेखील असेच एक प्रकरण सोनीपतमधून समोर आले आहे. मोनिका नावाच्या मुलीची तिच्याच प्रियकराने हत्या केली. (Girlfriend Boyfriend Love Story and Murder)
गुमाड गावातील सुनीलने भांडणानंतर प्रेयसी मोनिकावर गोळ्या झाडून मृतदेह पुरला. मोनिका ही रोहतकमधील बालंद गावातील होती. कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या मोनिकाला सुनीलने भारतात परत बोलवून घेतल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. मोनिका भारतात परतल्याचे कुटुंबीयांना माहिती नव्हते. त्यामुळे घडलेला प्रकार पाहून त्यांनाही धक्का बसला आहे.
कसा आला संशय?
सोनीपतच्या मोनिकाची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. मोनिकाच्या कुटुंबीयांना वाटत होते की त्यांची मुलगी कॅनडात आहे, पण सत्य वेगळेच होते. मोनिकाच्या चुलत भावाने सांगितले की, ते एप्रिलमध्ये मोनिकाशी व्हिडीओ कॉलवर बोलले होते, जेव्हा त्याने पंखा चालू पाहिला होता. त्यावेळी कॅनडामध्ये कडाक्याची थंडी होती. त्याने मोनिकाला पंख्याबद्दल विचारले तेव्हा मोनिकाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याचा नंबर देखील ब्लॅकलिस्ट केला. यानंतरही मोनिका कॅनडात असल्याचे समजून घरातील सदस्य तिच्याशी बोलत राहिले. त्यानंतर मोनिकाने घरातील सदस्यांचे फोन उचलणे बंद केले असता त्यांना संशय आला.
नातेवाईकांनी गृहमंत्र्यांकडे दाद मागितली होती
त्यांनी मोनिकाचा शोध सुरू केला तेव्हा त्याला पाच महिन्यांनी कळले की सुनील मोनिकाला गुमड गावात ठेवत आहे. यानंतर मोनिकाच्या मावशीने सुनीलच्या विरोधात गन्नौर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र पोलिसांच्या कारवाईवर असंतुष्ट मोनिकाच्या कुटुंबीयांनी गृहमंत्री अनिल विज यांच्याकडे दाद मागितली आणि कारवाई करण्याची विनंती केली, त्यानंतर या प्रकरणाचा तपास रोहतकच्या आयजींकडे सोपवण्यात आला. रोहतकच्या आयजींनी हे प्रकरण भिवानी सीआयए-2 कडे वर्ग केले.
कॅनडाहून येताच मोनिकासोबत दुसरे लग्न केले
मोनिका 5 जानेवारी 2022 रोजी बिझनेस मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी कॅनडाला गेली होती, मात्र सुनीलने तिला 22 जानेवारीलाच कॅनडातून भारतात परत बोलावले होते. त्यानंतर 29 जानेवारी 2022 रोजी गाझियाबाद येथील आर्य समाज मंदिरात त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर 30 जानेवारीला मोनिका पुन्हा कॅनडाला गेली, मात्र सुनीलने तिला पुन्हा भारतात बोलावून कॅनडाला परत जाऊ दिले नाही. मोनिकाच्या कॅनडा प्रवासाचा सर्व खर्च सुनीलने उचलला होता. सुनील आधीच विवाहित होता, त्याला दोन मुलेही आहेत. तरी त्याने मोनिकाशी लग्न केले.
आधी राखी बांधली, मग लग्न केलं...
मोनिका गुमाड गावात तिच्या मावशीच्या घरी राहायची. मोनिकाला भेटल्यावर सुनील दूध घेण्यासाठी मावशीच्या घरी येत असे. सुरुवातीला त्यांनी मोनिकाला बहीण मानले आणि रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी मोनिकाला राखीही बांधली, पण नंतर जेव्हा दोघांची जवळीक वाढली तेव्हा त्यांनी भाऊ-बहिणीचे पवित्र नाते विसरून लग्न केले.
निर्जन रस्त्यावर गोळ्या घालून केलं ठार
सुनील मोनिकाला सोबत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी थांबला. काही दिवसांनी सुनील आणि मोनिका यांच्यात भांडण झाले. जूनमध्येच मोनिकाला गाडीत घेऊन सुनील गढी झांझारा येथील फार्म हाऊसकडे जात असताना वाटेत पुन्हा काही कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यावर रागाच्या भरात सुनीलने मोनिकाची कारमधील अवैध पिस्तुलाने दोन वेळा गोळ्या झाडून हत्या केली.