पार्श्वभागात ४० लाख रूपयांचं सोनं लपवून दुबईहून भारतात आला, चेन्नईत झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:14 PM2021-07-21T18:14:05+5:302021-07-21T18:17:35+5:30

कस्टमशी निगडीत नियमांनुसार, परदेशातून भारतात येणारे लोक त्यांच्यासोबत २० ग्रॅम सोनं विना कोणतंही शुल्क देशात आणू शकतात.

Man carried gold worth over 40 lakh rupees in his rectum from Dubai to Chennai arrested | पार्श्वभागात ४० लाख रूपयांचं सोनं लपवून दुबईहून भारतात आला, चेन्नईत झाली पोलखोल

पार्श्वभागात ४० लाख रूपयांचं सोनं लपवून दुबईहून भारतात आला, चेन्नईत झाली पोलखोल

Next

दुबईहून भारतात परतलेल्या एका व्यक्तीला कस्टम अधिकाऱ्यांनी ८१० ग्रॅम सोन्यासोबत पकडलं आहे. साधारण ४० लाख रूपयांचं हे सोनं या व्यक्तीने त्याच्या पार्श्वभागाच्या आत लपवून दुबईहूनचेन्नईला आला होता. अशात कस्टम अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी त्याला अटक केली आहे.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, सोन्याची पेस्ट बनवून त्याचे चार गोळे करून मलाशयात लपवले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन ८१० ग्रॅम आहे आणि किंमत ४०.३५ लाख रूपये इतकी आहे.

कस्टमशी निगडीत नियमांनुसार, परदेशातून भारतात येणारे लोक त्यांच्यासोबत २० ग्रॅम सोनं विना कोणतंही शुल्क देशात आणू शकतात. या सोन्याची किंमत ५० हजार रूपयांपेक्षा जास्त असू नये. महिलांसाठी ही सीमा ४० ग्रॅम इतकी आहे. ज्याची किंमत १ लाख रूपयांपेक्षा जास्त असू नये. 

परदेशातून खासकरून अरब देशातून बेकायदेशीरपणे चेन्नईपर्यंत सोनं आणणं ही काही नवीन घटना नाही. याआधीही सप्टेंबरमध्येही दुबईतून येणाऱ्या दोन लोकांना मलाशयातून सोनं आणताना पकडलं हों. त्यावेळी कस्टम विभागाने ७०६ ग्रॅम सोनं जप्त केलं होतं.
 

 

Web Title: Man carried gold worth over 40 lakh rupees in his rectum from Dubai to Chennai arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.