लहान उमरीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By नितिन गव्हाळे | Updated: April 6, 2023 18:04 IST2023-04-06T18:04:04+5:302023-04-06T18:04:37+5:30
अकोला: लहान उमरी परिसरातील महादेव मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ...

लहान उमरीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला: लहान उमरी परिसरातील महादेव मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात सिव्हील लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
लहान उमरीत राहणारे संजय मोहोड यांच्या घरात भाड्याने किशोर आत्माराम बाईस्कार(४४) हे राहत होते. गुरूवारी सकाळी घरात कोणी नसताना, त्यांनी घरातील हॉलमधील पंख्याला दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीकृष्ण वाघमारे(रा. उगवा) यांच्या तक्रारीनुसार सिव्हील लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. किशोर बाईस्कार यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजु शकलेले नाही. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.