किडनी खराब झाली म्हणून मी चोरी केली, पोलिसांनी पकडलेल्या चोराचा खुलासा....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:12 PM2022-06-20T13:12:56+5:302022-06-20T13:13:36+5:30
UP Crime News : पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले 14 हजार रूपये आणि बाइक ताब्यात घेतली. 18 जून रोजी जय प्रकाश वर्मा पत्नीसोबत बाइकने जात होते. रस्त्या बाइकवरून आलेल्या तीन चोरांनी जय प्रकाशची बाइक थांबवली.
उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) बस्ती जिल्ह्यात बाइकवरून जात असलेल्या दाम्पत्याला लुटल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान एका आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याची किडनी खराब झाली आहे. उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने ही चोरी केली. या चोरी त्याचे दोन मित्रही सोबत होते.
पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले 14 हजार रूपये आणि बाइक ताब्यात घेतली. 18 जून रोजी जय प्रकाश वर्मा पत्नीसोबत बाइकने जात होते. रस्त्या बाइकवरून आलेल्या तीन चोरांनी जय प्रकाशची बाइक थांबवली. त्यांना लुटलं आणि घटनास्थळावरून फरार झाले.
पळून जाताना चोरांची बाइक समोरच्या खांबाला भिडली आणि डिग्गीत ठेवलेली बाइकची खरी नंबर प्लेट पडली. जय प्रकाश यांनी जेव्हा पोलिसात याबाबत तक्रार दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना तिथे ती पडलेली नंबर प्लेट सापडली. पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की, ही बाइक एका होमगार्डची आहे.
होमगार्डची चौकशी केली गेली तेव्हा समजलं की, त्याची बाइक त्यांचा मुलगा सौरभ सिंह चालवतो. पोलिसांनी मग सौरभची चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. सोबतच मित्रांचीही नावे सांगितली जे या चोरीत सोबत होते. पोलिसांनी सौरभ आणि त्याचे दोन मित्र हरिनारायण सिंह व प्रिन्स सिंह याना अटक केली.
चौकशीवेळी पोलिसांना सौरभने सांगितलं की, त्याची किडनी खराब झाली आहे. उपचारासाठी पैशांची गरज भासते. पण जेव्हा त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते तर त्याने हे मित्रांना सांगितलं. नंतर तिघांनी लुटण्याचा प्लान केला. पुढील चौकशी सुरू आहे.