पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने स्वत:वर झाडली गोळी, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केल शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:42 AM2021-04-17T11:42:53+5:302021-04-17T11:43:28+5:30
व्हिडीओमद्ये नबीने डीएमकडे आपल्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी या व्यक्तीने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागणी करणारा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. ज्यात आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सद्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
काय आहे प्रकरण?
कासगंजमद्ये राहणाऱ्या नबी हसन(३५ वर्षे)ने गेल्या शुक्रवारी सकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी या व्यक्तीने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. यात व्हिडीओत त्याने हे पाउल का उचललं याचं कारण सांगितलं आहे. (हे पण वाचा : २ वर्षे अनैतिक संबंधांनंतर प्रियकराला देत होती त्रास, माथेफिरू रोमिओने प्रेयसी अन् तिच्या मैत्रिणीची केली हत्या!)
काय म्हणाला?
व्हिडीओत त्याने सांगितले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या तौफीकसोबत त्याच्या पत्नीचं अफेअर सुरू आहे. जेव्हाही तो पत्नीला घेऊन दिल्ली किंवा गाझियाबादला गेला तेव्हा तेव्हा तौफीकही तिथे पोहोचला होता. अनेकदा तौफीकला असं न करण्यास सांगण्यात आले. पण त्याने काही ऐकलं नाही. त्यामुळे नबी पत्नीला घेऊन पटियालीमध्ये आपल्या घरी राहू लागला.
पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कारवाईची मागणी
बऱ्याचदा समजावून सांगितल्यावरही तौफीक काही सुधरला नाही. त्यामुळे नबी हसनने याबाबत तौफीकच्या परिवाराकडे तक्रार केली. पण त्याला समजावण्याऐवजी त्याच्या भावाने आणि वडिलाने नबी हसनलाच घरात घुसून मारहाण केली. इतकेच नाही तर या सर्वात त्याची पत्नीही आरोपींची साथ देत होती. (हे पण वाचा : प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!)
नबीला त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे धक्का बसलेल्या नबी हसनने आत्महत्या केली. व्हिडीओमद्ये नबीने डीएमकडे आपल्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याप्रकरणी अपर पोलीस अधिक्षक आदित्य प्रकाश वर्मा म्हणाले की, सकाळी ७ वाजता नबीने स्वत:वर गोळी झाडून घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यासंबंधी व्हिडीओही मिळाला आहे. ज्यात त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ तपासला जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.