बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:26 PM2021-05-31T21:26:25+5:302021-05-31T21:27:27+5:30

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ही घटना घडली आहे.

man drown in river during tiktok video at punjab prant pakistan | बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

googlenewsNext

इस्लामाबाद: टिकटॉक हे अॅप अतिशय लोकप्रिय आहे. भारतामध्ये या अॅपला बंदी असली, तरी शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये हे अॅप अतिशय लोकप्रिय आहे. मात्र, याच टिकटॉक व्हिडिओच्या नादामुळे एक जण नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ही घटना असून, या तरुणासोबतचा मित्र सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. (man drown in river during tiktok video at punjab prant pakistan)

भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेवरून झालेल्या संघर्षानंतर टिकटॉकसह अन्य अनेक अॅप्सवर बंदी घालण्यात आली. मात्र, पाकिस्तानमध्ये हे अॅप सुरू असून, तुफान लोकप्रिय झाले आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पंजाब प्रांतातील शेख अली नामक तरुण आपल्या मित्रासोबत झेलम नदीच्या किनारी टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी गेला. अलीचा मित्र व्हिडिओ शुटिंग करत होता. अलीने पाण्यात उडी मारली. मात्र, बराचवेळ झाला, तरी तो पाण्याच्या बाहेर येईना. शेवटी मित्राने गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेवटी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. 

वाद वाढला! नवीन आयटी नियमांचे पालन केलं जातंय; ट्विटरचा दावा केंद्रानं फेटाळला

दरम्यान, बचाव पथकाकडून अद्यापही या मुलाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वीही असे व्हिडिओ बनवताना अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही टिकटॉक व्हिडिओ बनवताना एका तरुणाचा मृत्यू झाला. एक तरुण आत्महत्येचा सीन शूट करत होता. मात्र, व्हिडिओ करण्याच्या नादात या मुलाला आपला जीव गमवावा लागला. या तरुणाचे ८ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, तर त्याने आतापर्यंत ६०० व्हिडिओ तयार केले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 
 

Web Title: man drown in river during tiktok video at punjab prant pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.