बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 12:12 PM2021-03-03T12:12:53+5:302021-03-03T12:16:47+5:30

बलात्काराच्या आरोपाखाली दोषी आढळलेल्या तरुणाची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता; ४३ वर्षांचा विष्णू तुरुंगातून बाहेर येणार

Up Man Found Not Guilty Of Rape After Spent 20 Years In Jail By Allahabad High Court | बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं

बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं

Next

आग्रा: बलात्कार प्रकरणात गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीची अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. विष्णू तिवारी असं निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विष्णू २३ वर्षांचा असताना न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो बलात्काराच्या आरोपात दोषी आढळला होता. आता २० वर्षांनंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण या कालावधीत त्यानं त्याचे आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमावले.

भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघड

विष्णूची लवकरच तुरुंगात मुक्तता केली जाईल. आम्ही यासाठी आदेशाची वाट पाहत आहोत, अशी माहिती आग्र्याच्या तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही. के. सिंह यांनी सांगितलं. विष्णूनं कोणताही अपराध केला नसताना त्याला २ दशकं तुरुंगात काढावी लागली. ही बाब दुर्देवी असल्याचं सिंह पुढे म्हणाले.

आयपीसी आणि एससी/एसटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल
विष्णू उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी आहे. वर्ष २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णूवर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि दोन भावांसोबत राहायचा. कुटुंबाला मदत करण्यासाठी तो नोकरी करत होता.

महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटक

वडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकला
ट्रायल कोर्टानं विष्णूला दोषी ठरवलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये त्याची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. २००५ मध्ये विष्णूनं उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्याला आव्हान देता आलं नाही. सहा वर्षांपूर्वी विष्णूच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्याला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. दोन भावांच्या अंत्यविधींनादेखील तो गैरहजर होता.

Web Title: Up Man Found Not Guilty Of Rape After Spent 20 Years In Jail By Allahabad High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग