प्रेमसंबंध घरच्यांना सांगण्याची धमकी देत मॅनेजर तरुणीला ६ लाखांना लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 14:59 IST2019-06-18T14:56:32+5:302019-06-18T14:59:48+5:30
ही तरुणी एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करते..

प्रेमसंबंध घरच्यांना सांगण्याची धमकी देत मॅनेजर तरुणीला ६ लाखांना लुबाडले
पुणे : त्या तरुणाचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर तरुणीला प्रेमसंबंधाविषयी घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन तब्बल ६ लाख रुपये लुबाडणाऱ्या तरुणाला खडकी पोलिसांनीअटक केली आहे़.
चेतन अशोक खोसे (वय २८) असे त्याचे नाव आहे़. खडकी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार मे २०१० ते ५ मे २०१९ दरम्यान घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करते. त्यांच्याच बँकेत असलेल्या चेतन खोसे याच्याशी त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले़. ते एकत्र फिरु लागले़. दरम्यान, तो दुसऱ्या बँकेत नोकरीला लागला़ काही दिवसांनी या तरुणीला चेतनचे लग्न झाले असल्याची माहिती मिळाली़ तेव्हा ती चेतनला टाळू लागली़. त्यानंतर चेतनने तिला धमकी देण्यास सुरुवात केली़. तुला मला भेटावेच लागेल, असे म्हणत धमकावू लागला़. या तरुणीने त्याची भेट घेतल्यावर आपले प्रेमसंबंध असल्याची माहिती तुझ्या आईवडिलांना सांगतो असे म्हणून तिच्याकडे पैशांची मागणी करुन लागला़. सुरुवातीला तिने घराच्यापासून हे लपविण्यासाठी तो मागेल तिकडे त्याला पैसे देऊ लागली़. त्यानंतर त्याची मजल वाढत गेली़. त्याने तिला बँकेतून कर्ज काढून ४ लाख रुपये दे, असे सांगितले़. त्याप्रमाणे तिने कर्ज काढून त्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले़. तरीही त्याची पैशाची हाव काही सुटत नव्हती़, अशाप्रकारे तिने वेळोवेळी ६ लाख १८ हजार रुपये दिले़. त्यानंतरही त्याचे धमक्या देणे सुरु असल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून तिनेच आपल्या आईवडिलांना हा सर्व प्रकार सांगितला़. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी चेतन खोसे याला अटक केली आहे़.
..............