मान गये सरजी; खुद्द पोलीस महासंचालकांनी FB वरून दिला Work Report
By पूनम अपराज | Updated: July 18, 2021 15:31 IST2021-07-18T15:11:33+5:302021-07-18T15:31:09+5:30
DGP Sanjay Pande : महत्वाचे म्हणजे दलातील प्रत्येक पोलिसांपर्यंत आणि जनसामान्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा पांडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे त्यांची पोलीस दलाबरोबरच इतर नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे.

मान गये सरजी; खुद्द पोलीस महासंचालकांनी FB वरून दिला Work Report
पूनम अपराज
महाराष्ट्र पोलीस दलात काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबतचे आदेश येण्याची शक्यता आहे. तडफदार आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संजय पांडे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि पोलीस दलातील प्रलंबित कामांना मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. महत्वाचे म्हणजे दलातील प्रत्येक पोलिसांपर्यंत आणि जनसामान्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा पांडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे त्यांची पोलीस दलाबरोबरच इतर नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आज फेसबुक पोस्ट करून आठवड्याभरात केलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावरून आपल्या कामाचा वर्क रिपोर्ट देणारे हे पहिलेच राज्यातील अधिकारी असावेत. पांडे यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टमधून ३५ ASI यांचे PSI म्हणून प्रमोशन केले. तसेच हेड कॉन्स्टेबल ते RSI प्रमोशनची यादी तयार असून लोकांच्या विनंतीप्रमाणे जनरल बदल्यांनंतर करण्यात येईल. गडचिरोलीवरून गट बदली सुरु करण्यात आली असून पुढच्या आठवड्यात ५० लोकांपर्यंत सोडता येईल. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सला प्रतिनियुक्तीवर गेलेल्या लोकांना २४ टक्के भत्ते मिळावे ह्याकरिता पाठपुरावा सुरु आहे. गडचिरोलीला स्पेशल भरतीचे आदेश मिळाले असून भरती पुढच्या दोन महिन्यात होईल. IRB अकोलासाठी नियुक्ती सुद्धा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून दोन महिन्यात होईल. ग्रुप ४ चे प्रमोशन नागपूरला देण्यात आले असून इतर रेंजमध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यापर्यंत होतील. RPI यांना DYSP चे प्रमोशन देण्याबाबत SRPF मध्ये DYSP साठी [रामोशन चे ३० टक्के पदांमध्ये प्रमोशन देण्याबाबत विचार सुरु आहे. PI ते DYSP चे प्रमोशन सर्व डिटेल्स शासनाला देण्यात आले असून पुढच्या आठवड्यात आदेश निघेल. मेडिकल कारणावरून समवर्ग बदली करून काही पोलीस इन्स्पेक्टर/ API यांना बदली देण्यात आली. अशी केलेल्या कामाचा तपशील दिला आहे.
तसेच प्रलंबित बाबी विचाराधीन मुद्दे आणि सर्वसाधारण सूचना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पांडे यांनी दिले आहेत. येणाऱ्या बकरी ईदबाबत त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या असून पोलिसांना बंदोबस्तासाठी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कोरोना अजून संपला नसून सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरून आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. शक्यतो गर्दी टाळा असे नागरिकांना आवाहन करत त्यांनी पोलिसांना बळाचा वापर करू नका असं पांडे यांनी आदेश दिला आहे.